गुढीपाडवा, आंबेडकर जयंती घरीच साजरी करा; महापौर किशोरी पेडणेकर यांचं आवाहन

उद्या गुढी पाडवा असून परवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे हे दोन्ही उत्सव घरीच आनंदाने साजरे करा, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं. (kishori pednekar Asks People To Celebrate gudi padwa and Ambedkar Jayanti From Home)

गुढीपाडवा, आंबेडकर जयंती घरीच साजरी करा; महापौर किशोरी पेडणेकर यांचं आवाहन
किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 11:33 AM

मुंबई: मुंबईसह राज्यात कोरोनाची परिस्थिती भयानक आहे. कोरोना रोखायचा असेल तर गर्दी न करणं आणि इतरांच्या संपर्कात न येणं हाच त्यावर उपाय आहे, असं सांगतानाच उद्या गुढी पाडवा असून परवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे हे दोन्ही उत्सव घरीच आनंदाने साजरे करा, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं. (kishori pednekar Asks People To Celebrate gudi padwa and Ambedkar Jayanti From Home)

किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून हे आवाहन केलं. प्रत्येकाने गुढीपाडवा घरीच साजरा करावा. बाबासाहेबांची जयंतीही घरीच साजरी करा. बाबासाहेबांनी केलेली देशसेवा स्मरून आपणही घरी राहून देशसेवा करू, तेच खर अभिवादन ठरेल, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

बेड अडवू नका

अनेक रुग्ण बरे झाल्यानंतरही बेड्स अडवतानाच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे इतर रुग्णांना बेड मिळत नाहीत. त्यामुळे कोणीही बेड अडवू नका, असं आवाहन पेडणेकर यांनी केलं.

फास्टट्रॅक पद्धतीने बेड्स मिळणार

रुग्णांना बेड मिळावेत म्हणून आम्ही पाऊल उचलले आहेत. प्रत्येक वॉर्डात दोन नोडल अधिकारी नेमण्यात येत आहेत. दोन शिफ्टमध्ये हे अधिकारी काम करतील आणि रुग्णांना फास्ट ट्रॅकपद्धतीने बेड देतील. रात्री रुग्णांना बेड्स देण्यासाठी ते विशेषत: प्रयत्न करतील, असं त्यांनी सांगितलं. 1996 या फोनवर बेड्ससाठी फोन केल्यावर हा फोन व्यस्त असल्याचं दिसून येतं. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही ज्या प्रभागात राहता, तेथील वॉर रुमलाच फोन करा, म्हणजे तुम्हाला मदत मिळणंही शक्य होईल आणि हेल्पलाईन क्रमांकही व्यस्त येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

24 तासांत रिपोर्ट द्या

कोरोना रुग्णांचा रिपोर्ट 24 तासांत देण्याचे आदेश पालिकेने लॅबला दिले आहेत. 24 तासांत रिपोर्ट मिळाल्यास लवकर उपचार करणं शक्य होईल आणि योग्य ठिकाणी वर्गवारी करून रुग्णांना रुग्णालयात दाखल करणं शक्य होईल. लक्षणे नसलेले रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होत आहे. त्यामुळे या रुग्णांना राहण्यासाठी हॉटेल्स ताब्यात घेण्यात येत आहेत. या हॉटेलमध्ये कोविड सेंटरसारखीच सुविधा असणार आहे. मात्र, त्यासाठी पैसे भरावे लागणार असून रुग्णांना हॉटेल निवडण्याची परवानगी देण्यात येईल, असंही त्यांनी स्प्ष्ट केलं. (kishori pednekar Asks People To Celebrate gudi padwa and Ambedkar Jayanti From Home)

सात दिवसात 1100 बेडचं कोविड सेंट

पालिकेने 325 अतिरिक्त आयसीयू बेड्स जोडले आहेत. 466 बेड तयार आहेत. येत्या 7 दिवसात 1100 बेडचं कोविड सेंटर तयार करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (kishori pednekar Asks People To Celebrate gudi padwa and Ambedkar Jayanti From Home)

संबंधित बातम्या:

कोरोना विस्फोटक परिस्थिती मे अखेरपर्यंत राहणार, माणसं मरत असताना उत्सव कशाला?; वडेट्टीवारांचा घणाघात

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?

LIVE | मंत्री नवाब मलिक यांनी बीकेसी कोवीड सेंटर इथे घेतली कोरोनाची लस

(kishori pednekar Asks People To Celebrate gudi padwa and Ambedkar Jayanti From Home)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.