सुशांतसिंग, दिशा सालियान प्रकरणात महापौरांचं राज्य महिला आयोगाला पत्र, मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल देण्याचे आदेश
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार अर्ज सादर केला आहे. राज्य महिला आयोगाकडूनही या अर्जाची दखल घेण्यात आलीय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल सादर कऱण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची जागा आता शिवराळ भाषा आणि चिखलफेकीनं घेतली आहे. अशावेळी अभिनेता सुशांतसिंग राजपूत (SushantSingh Rajput) आणि दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणावरुनही गंभीर आरोप केले जात आहेत. या प्रकरणी आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज्य महिला आयोगाला (State Women’s Commission) तक्रार अर्ज सादर केला आहे. राज्य महिला आयोगाकडूनही या अर्जाची दखल घेण्यात आलीय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल सादर कऱण्याचे आदेश दिले आहेत.
सुशांतसिंग राजपूतची व्यवस्थापक राहिलेल्या दिशा सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नाही. तसंच त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याला तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे.
राज्य महिला आयोगाकडून तक्रारीची दखल
दरम्यान, राज्य महिला आयोगाने किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेतली आहे. दिशा सालियान प्रकरणात महिला आयोगाने अहवाल मागवला आहे. मालवणी पोलिसांना 48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश चाकणकर यांनी दिले आहेत. दिशा सालियानचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट तिच्या आई वडिलांना मान्य आहे. त्यांनी त्याला दुजोरा दिलाय, अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिलीय.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे.(1/4) pic.twitter.com/60qtTG4Ij6
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 21, 2022
नारायण राणेंचा आरोप आणि इशारा
‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?’, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे.
खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 18, 2022
इतर बातम्या :