फतेहनगर ते संभाजीनगर व्हाया औरंगाबाद, तुम्हाला माहिती आहे का औरंगाबादचे नामांतर किती वेळा झाले?

औरंगाबाद शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे

फतेहनगर ते संभाजीनगर व्हाया औरंगाबाद, तुम्हाला माहिती आहे का औरंगाबादचे नामांतर किती वेळा झाले?
औरंगाबाद झाले आता संभाजीनगर
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 8:17 AM

मुंबई : औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद या शहराचे नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर” करण्याच्या प्रस्तावास गृह मंत्रालयने २४ फेब्रुवारी, २०२३ पत्रानुसार मंजुरी दिली आहे. पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, ” औरंगाबाद “, तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदलून ते “ छत्रपती संभाजीनगर “, तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.

उस्मानाबाद” या शहराचे नाव बदलून ते “धाराशिव” असे करण्याच्या भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे पत्र ७ फेब्रुवारी, २०२३ अन्वये दिलेल्या मंजूर केले आहे. यामुळे “उस्मानाबाद” चे “धाराशिव ” झाले आहे.

हे सुद्धा वाचा

कधीपासून होती मागणी

1988 पासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘ छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. औरंगजेबाच्या नावाला विरोध करून बाळासाहेब ठाकरेंनी ‘संभाजीनगर’ची घोषणा केली. परंतु तुम्हाला शहराचे नाव किती वेळा बदलले हे माहीत आहे का?

काय आहे इतिहास

औरंगाबाद शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे औरंगाबाद मानले जाते आहे.चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या महान हिंदू साम्राज्याचे सम्राट राजे कृष्णदेव राया यांच्या वंशजांचे यादवांचे राज्य होते.

काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहनगर ठेवले होते.

  • कसे झाले नामांतर
  • 1626 : मलिक अंबरचा मुलगा फतेह खानने फतेहनगर नाव दिले.
  • 1636 : शहाजहान बादशहाने औरंगजेबाला इथे पाठवले. त्याने ‘खुजिस्ता बुनियाद’ नाव दिले.
  • 1657 : औरंगजेबाने पुन्हा नाव बदलून ‘औरंगाबाद’ केल.
  • 1988 : औरंगजेबाच्या नावाला विरोध करून बाळासाहेब ठाकरे यांनी ‘संभाजीनगर’ची घोषणा केली.
  • 1995 : युती सरकारने घेतला दोन्ही शहरांच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. पण नंतर प्रकरण कोर्टात गेले.
  • 1999 : काँग्रेस सरकारने नामांतराचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे कोर्टात सांगितले.
  • 29 जून 2022 : उद्धव ठाकरे सरकारची संभाजीनगरच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात मंजुरी.
  • 16 जुलै 2022 : ‘छत्रपती संभाजीनगर’ असा नामविस्तार करून शिंदे सरकारकडून मंजुरी.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.