कोपरी स्टेशन परिसरातील देहविक्रय व्यवसाय आठ दिवसात बंद करा, अन्यथा मूक मोर्चा, भाजपचा इशारा
देहविक्रय करणाऱ्या महिला खुलेआम रस्त्यावर दिसून येत असल्याने कोणतीही भीती या महिलांच्या मनात उरली नाही.
ठाणे : ठाणे पूर्व येथील कोपरी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर देहविक्रय (Kopari Railway Station Stop Prostitution) करणाऱ्यांचा व्यवसाय सुरु असून याचा नाहक त्रास स्थानिक महिलांना होत आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला खुलेआम रस्त्यावर दिसून येत असल्याने कोणतीही भीती या महिलांच्या मनात उरली नाही. या व्यवसायामुळे सामान्य घरातील महिलांकडे देखील वेगळ्या नजरेने बघितले जात आहे (Kopari Railway Station Stop Prostitution).
येत्या 8 दिवसात कोपरी येथील वेश्या व्यवसाय बंद झाला नाही. तर, पोलीस स्टेशनवर महिलांचा मुक मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिला आहे. तसेच, स्थानिक कोपरी पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन देखील देण्यात आले आहे.
कोपरी येथील स्टेशन परिसरात लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणावर काही महिला बाहेरुन येऊन देहविक्रय करत आहेत. याठिकाणी सर्रासपणे महिला उभ्या राहतात आणि याच कारणामुळे स्थानिक महिलांना खाली मान घालून रस्त्यावरुन जावं लागतं. याबाबत स्थनिक नगरसेवक यांच्याकडे तक्रारी प्राप्त होत होत्या.
हीच बाब लक्षात घेता स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावर तोडगा निघावा यासाठी पोलिसांनी लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. दरम्यान, नगरसेवक भरत चव्हाण यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन कोपरी पोलिसांना निवेदन दिले. येत्या 8 दिवसात येथील देहविक्रय व्यवसाय बंद झाला नाही तर महिलांचा मुक मोर्चा काढू असा इशारा भाजप नगरसेवक यांनी यावेळी दिला आहे.
पुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घटhttps://t.co/pZCnFVEdy1 #Pune #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2020
Kopari Railway Station Stop Prostitution
संबंधित बातम्या :
नागपुरात ऑनलाईन देहविक्रीचा व्यवसाय, दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु