‘लाच’ देण्यासाठी कुणाल कामरा राज ठाकरेंच्या घराबाहेर उभा

कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. यावेळी कुणाल कामरा थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहचला.

'लाच' देण्यासाठी कुणाल कामरा राज ठाकरेंच्या घराबाहेर उभा
Follow us
| Updated on: Feb 04, 2020 | 10:25 AM

मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. यावेळी कुणाल कामरा थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहचला (Kunal Kamra bribe Raj Thackeray). यावेळी त्याने राज ठाकरेंना थेट ‘लाच’ देऊ केली आहे. लाचेच्या स्वरुपात त्याने राज ठाकरेंना त्यांच्या आवडीचे मुंबईतील किर्ती कॉलेजजवळील ‘किर्तीचे वडे’ आणले. याबाबत त्याने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली.

कुणाल कामराने राज ठाकरेंना एक पत्रही लिहिलं आहे. यात राज ठाकरेंनी वेळ द्यावा, अशी विनंती केली आहे. या पत्रात कुणाल कामरा म्हणाला, “मी बरंच संशोधन केलं. यात तुम्ही मुंबईतील किर्ती वड्याचे मोठे चाहते असल्याचं लक्षात आलं. म्हणून मी तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ लाच म्हणून देतो आहे. जेणेकरुन तुम्ही माझ्या ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल.”

पत्राच्या अखेर कुणाल कामराने राज ठाकरेच्या प्रति प्रेम दाखवत ते वेळ देतील अशी आशाही व्यक्त केली. कुणाल कामराने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “राज ठाकरे सर आता तरी मला वेळ द्या. सर्व लोकांना वाटतं की मला माझ्या शोमध्ये पाहुण्यांना आणण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. हे बघा पाहुण्यांना आणण्यासाठी मी किती प्रयत्न करत असतो. तुमच्यापर्यंत अधिक चांगली माहिती पोहचवण्यासाठी मी यापेक्षाही अधिक प्रयत्न करणार आहे.”

दरम्यान, इंडिगोच्या विमानात प्रवासादरम्यान पत्रकार अर्नब गोस्वामी यांना प्रश्न विचारत व्हिडीओ काढल्याने इंडिगोने कुणाल कामरावर 6 महिन्यांची बंदी घातली होती. त्याप्रकरणी कुणाल कामराने (Kunal Kamra) इंडिगो एअरलाईनकडून करण्यात आलेल्या 6 महिन्यांच्या बंदीला कायदेशीर आव्हान देत नोटीस पाठवली होती (Kunal Kamra issues legal notice to indigo airlines). या नोटीसमध्ये कुणाल कामराने 6 महिन्यांची बंदी हटवण्याची, 25 लाख रुपये नुकसान भरपाई करण्याची आणि विनाअट माफी मागण्याची मागणी केली होती (Kunal Kamra issues legal notice to indigo airlines). त्यानंतरही तो चांगलाच चर्चेत आला होता. कुणाल कामराने दिलेल्या कायदेशीर नोटीसला इंडिगो काय प्रतिसाद देते आणि हे प्रकरण पुढे काय वळणं घेतं याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

कुणाल कामराच्या वकिलांनी इंडिगो एअरलाईनला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं, ‘इंडिगो एअरलाईनने कोणत्याही योग्य कारणाशिवाय माझ्या अशिलावर बंदी घालून त्यांना मानसिक त्रास दिला आहे. या बंदीमुळे त्यांचे भारत आणि परदेशातील पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले आहे. यामुळे त्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. इंडिगो एअरलाईनने बंदीची केलेली कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ही कारवाई डीजीसीए सीएआरच्या नियमांचं उल्लंघन करते. त्यामुळे इंडिगो एअरलाईनने त्यांच्यावरील बंदी तात्काळ हटवावी. त्यांना मानसिक त्रास दिल्याबद्दल विनाअट माफी मागावी आणि त्याच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून 25 लाख रुपये द्यावेत.’

कुणाल कामराच्या कायदेशीर नोटीसवर इंडिगोकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. त्यामुळे इंडिगो यावर काय प्रतिसाद देते हे पाहावे लागणार आहे. विशेष म्हणजे इंडिगो एअरलाईनमध्ये झालेल्या या विवादास्पद घटनेनंतर स्पाईसजेट, एयर इंडिया आणि गो एयर या एअरलाईनने देखील कुणाल कामरावर बंदी घातली होती. त्यांनी या घटनेशी थेट कोणताही संबंध नसताना केलेल्या या कारवाईलाही कायदेशीर आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कुणाल कामरावर 6 महिन्यांची बंदी घालण्याच्या इंडिगो एअरलाईनच्या निर्णयावर अभिनेत्री रवीना टंडनने देखील प्रतिक्रिया दिली आहे. रवीना टंडन म्हणाली, ‘मला कुणाल कामराचे विनोद आवडत नाही. तो वाईट आणि व्यक्तिगत विनोद करतो. मात्र, त्याच्यावरील प्रवास बंदीची कारवाई चुकीची आहे. त्याला कोणताही तर्क नाही. त्याबाबतीत मी त्याच्यासोबत उभी आहे.’

Kunal Kamra bribe Raj Thackeray

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.