Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#LataMangeshkar : लता मंगेशकर व्हेंटिलेटरवर; लवकर बऱ्या व्हा, सोशल मीडियावर लोक करताहेत प्रार्थना

Lata Mangeshkar health update : लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा एकदा नाजूक झाली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं आहे. त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालया(Breach candy hospital)त दाखल करण्यात आलं. आता सोशल मीडियावर त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

#LataMangeshkar : लता मंगेशकर व्हेंटिलेटरवर; लवकर बऱ्या व्हा, सोशल मीडियावर लोक करताहेत प्रार्थना
लता मंगेशकर
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 4:22 PM

Lata Mangeshkar health update : लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा एकदा नाजूक झाली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालया(Breach candy hospital)त दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्या आयसीयू(ICU)मध्ये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती, मात्र अचानक त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली, त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं. सध्या डॉक्टरांचं पथक 24 तास त्यांच्यावर देखरेख करत असून त्यांची प्रकृती तपासत आहे. लता मंगेशकर यांना काही दिवसांआधी कोरोना व्हायरची लागण झाली होती. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला आहे. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली सध्या ठेवण्यात आलं आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रार्थना करण्याचं आवाहन

काही दिवसांआधी डॉक्टरांनी लता मंगेशकर यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा असं सांगितलं होतं. डॉक्टरांचं विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. डॉ. प्रतित समदानी यांनी काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या हितचिंतकांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं.

ट्विटरवर ट्रेंड

त्यांची प्रकृती पुन्हा एकदा ढासळली असली, तरी त्या लवकर बऱ्या होण्यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. #LataMangeshkar हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करू लागल्या आहेत. लोक ट्विट करून त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. एक नजर टाकू या काही निवडक ट्वीट्सवर…

Lata Mangeshkar health update : लता मंगेशकरांची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास, व्हेंटिलेटरवर ठेवले

Lata Mangeshkar health update : लतादीदींची प्रकृती बिघडली, राज ठाकरे ब्रीच कँडीत दाखल

Nitesh Rane: नितेश राणेंचा रक्तदाब वाढला, ओरोसमधून कोल्हापूरला नेणार; कुणालाही भेटण्यास मनाई

कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल.