Video : टीव्ही9 चा स्पेशल रिपोर्ट! खेडच्या सभेनंतर शिवसेना आणि ठाकरे गटाचे नेते आमनेसामने
खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेवर ठाकरे गटाचे नेते पुन्हा तुटून पडले. खेडच्या सभेनंतर शिवसेना आणि ठाकरे गटाचे नेते कसे आमनेसामने आलेत.
मुंबई : खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेवर ठाकरे गटाचे नेते पुन्हा तुटून पडले. खेडच्या सभेनंतर शिवसेना आणि ठाकरे गटाचे नेते कसे आमनेसामने आलेत.
खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतली आणि उद्धव ठाकरेंच्या त्याच गोळीबार मैदानातल्या गद्दार टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. ज्या गोळीबार मैदानावरुन मुख्यमंत्र्यांची तोफ उद्धव ठाकरेंवर धडाडली. त्याच मैदानावरुन 2 आठवड्यांआधी उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर शाब्दिक गोळीबार केला होता. पण या गोळीबाराला शिंदेंनी फुसका बार म्हटलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खेडच्या सभेतून, उद्धव ठाकरेंचं नाव घेत हिंदुत्वाशी बेईमानी केल्याचा आरोप केला. पण शिंदेंचं भाषण म्हणजे भाजपची स्क्रीप्ट असल्याची टीका ठाकरे गटानं केलीय. एकनाथ शिंदेंच्याआधी रामदास कदमांनीही, उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाईंवर बोचरी टीका केली. त्यावरुन ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे आणि भास्कर जाधवांनी पलटवार केलाय.
उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेतून केलेल्या टीकेला शिंदेंसह त्यांच्या नेत्यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय. आता सुरुवात झालीय. यापुढंही जसजशा सभा होतील तसं शाब्दिक युद्ध आणखी तीव्र होईल.