150 महिलांना प्रत्येकी 5 हजारांची मदत, लर्निग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्डचा उपक्रम काय?

सर्व महिलांना 5 दिवसीय वित्तीय साक्षरता, डिजिटल व्यवसाय (Digital business) आणि महिला उद्योजकता , व्यवसाय योजना असे प्रशिक्षण देण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाअंतर्गत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई विभागातून लर्निग लिंक्स फोंडेशनच्या संपूर्ण मुंबई टीमने 1184 पेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे.

150 महिलांना प्रत्येकी 5 हजारांची मदत, लर्निग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्डचा उपक्रम काय?
महिलांसाठी विशेष बिझनेस ट्रेनिंगImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 6:28 PM

मुंबई : लर्निग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजकता आणि तंत्रज्ञान (WE and TECH) हा मोफत कार्यक्रम महामुंबई कार्यक्षेत्रामध्ये राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत सर्व महिलांना 5 दिवसीय वित्तीय साक्षरता, डिजिटल व्यवसाय (Digital business) आणि महिला उद्योजकता , व्यवसाय योजना असे प्रशिक्षण देण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाअंतर्गत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई विभागातून लर्निग लिंक्स फोंडेशनच्या संपूर्ण मुंबई टीमने 1184 पेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी 580 महिलांनी स्वतःची व्यवसाय योजना सादर केली होती. शिवाय, लेर्निंग लिंक्स फाउंडेशन या महिलांना उद्योजक बनवण्यासाठी उद्यम आधार कार्ड, एफएसएसएआय (FSSAI) लायसन्स, बँक लिंकेज लोन प्रोसेस, डिजिटल माध्यमातून बिझनेस करण्यासाठी मदत देखील करीत आहे.

महिलांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी अर्थसाहाय्य

महिला उद्योजकता आणि तंत्रज्ञान (WE and TECH) या कार्यक्रमामधील निवडक अशा १५० महिलांना आर्थिक साहाय्य म्हणून रुपये 5,000/-( Non Refundable Amount) देण्यात आले. हे आर्थिक साहाय्य महिलाना त्यांच्या उद्योगाला अधिक चालना देण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. तसेच प्रशिक्षण झालेल्या काही महिलांना लर्निग लिंक्स फाउंडेशनमार्फत प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम देखिल करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संपूर्ण महामुंबई कार्यक्षेत्रामधील महिलाना नवीन टेक्नोलॉजीशी अवगत करण्यासाठी देखिल महत्वाचा ठरणार आहे. हा कार्यक्रम रोजी लर्निग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला कुणाची उपस्थिती?

या अनुदान वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री सुभाष देसाई, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून माननीय श्रीमती ज्योतीताई ठाकरे, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)-महिला आर्थिक विकास महामंडळ, श्री. रोहिदास दोरकुलकर (उपसंचालक – राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान ,महाराष्ट्र) श्री. प्रसाद राजे भोसले (SMID-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान ,महाराष्ट्र ),श्री. पांडुरंग सपकाळ (दक्षिण मुंबई विभागीय प्रमुख ,शिवसेना ) आणि श्री. मोहम्मद आमिर एजाज ( व्यवस्थापकीय सल्लागार – लर्निंग लिंक्स फौंडेशन ,दिल्ली ) व इतर मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाचे मुंबई,ठाणे व उल्हासनगर चे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते .

विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया

सुभाष देसाई यांनी (उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य ) आपल्या मार्गदर्शना मध्ये महिलांचे आणि लर्निंग लिंक्स फॉउंडेशन तसेच मास्टरकार्ड यांचे अभिनंदन केले व महिलांना संबोधनमध्ये असे म्हणाले कि एक छोटी उदयोगिनी उद्याची उदोगपती होऊ शकते ही आजच्या महिलांना मध्ये शक्ति आहे, असे ते म्हणाले तर ज्योतीताई ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये बचत गटातील महिलांन करीता असणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली व महिलांना त्याचा लाभ घेण्यास प्रोसाहित केले तसेच त्यांनी लर्निंग लिंक्स फौंडेशन व मास्टरकार्ड यांचे विशेष आभार मानले . मोहमद आमिर एजाज (व्यवस्थापकीय सल्लागार – लर्निंग लिंक्स फौंडेशन , दिल्ली ) यांनी लर्निंग लिंक्स फौंडेशन यांच्या कार्यबदल व WE & TECH प्रोग्राम बदल माहिती दिली महिलांना त्यांचा भावी उद्योगासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Gold Rate today: चांदीला सोन्याचा दर, सोन्याच्या दरात नेमकी किती वाढ? जाणून घ्या आजचे दर

Narendra Modi Cabinet DA : नरेंद्र मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार , सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.