BMC Election | मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत येत्या मंगळवारी, 13 जूनला अंतिम आरक्षण होणार निश्चित

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 31 मे रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांना सहा जूनपर्यंत हरकती आणि सूचना मांडता येतील. 13 जून रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

BMC Election | मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत येत्या मंगळवारी, 13 जूनला अंतिम आरक्षण होणार निश्चित
मुंबई महापालिका Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 6:55 AM

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुका (Municipal elections) लांबवल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दोन आठवड्यांत महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला चार मे रोजी देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Election) मंगळवारी 31 मे रोजी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी अकरा वाजता आरक्षणाची सोडत जाहीर केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. या सोडत प्रक्रियेवर सहा जूनपर्यंत सूचना आणि हरकती मांडता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून वाढवण्यात आलेल्या नऊ प्रभागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने आता वार्डाची संख्या वाढली आहे.

236 प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत

यंदा राज्य निवडणूक आयोगाने वाढवलेल्या नऊ प्रभागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने वार्डाची संख्या वाढली आहे. पूर्वी एकूण 227 वार्ड होते. आता त्यात आणखी नऊ वार्डांची भर पडल्याने वार्डाची एकूण संख्या 236 वर गेली आहे. त्यामुळे वाढीव नऊ प्रभागांचे आरक्षणही यावेळी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण असते. त्यामुळे आरक्षणाचे सर्व निकष लक्षात घेऊन येत्या 31 मार्चला आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात 31 मे रोजी सकाळी अकरा वाजता ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

25 ठिकाणी हरकती नोंदवण्याची व्यवस्था

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी येत्या 31 मे रोजी आरक्षणाची सोडत जाहीर केली जाईल. प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर नागरिकांना सहा जूनपर्यंत सूचना आणि हरकती मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. महापालिकेच्या 24 प्रभागांमध्ये 25 ठिकाणी हरकती व सूचना नोंदवण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी जाऊन नागरिकांना आपल्या हरकती व सूचना नोंदवता येतील. त्यानंतर 13 जून रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.