खासदार गजानन कीर्तिकरांविरोधात शिवसेनेत खदखद, उपनेत्यांनी केली निरोपाचा नारळ देण्याची पत्राद्वारे मागणी

MP Gajanan Kirtikar : मुंबईतील पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर शिवसेनेत आता नवीन ट्विस्ट आला आहे. उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणी झाली आहे.

खासदार गजानन कीर्तिकरांविरोधात शिवसेनेत खदखद, उपनेत्यांनी केली निरोपाचा नारळ देण्याची पत्राद्वारे मागणी
किर्तीकरांच्या हकालपट्टीची मागणी
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 11:53 AM

लोकसभा निवडणूक 2024 साठी मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान झाले. मराठी टक्का, गुजराती आणि उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेऊन महायुती आणि महाआघाडीत जोरदार चुरस दिसली. पण आता शिंदे गटातील खदखद पण बाहेर आली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन आलेले खासदार गजानन कीर्तिकर यांची शिंदे गटातून लागलीच हकालपट्टी करण्याची मागणी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कीर्तिकरांना नारळ देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

उपनेते शिशिर शिंदे आक्रमक

शिवसेना उपनेते शिशिर शिंदे खासदार कीर्तिकरांविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र धाडले आहे. गजानन किर्तीकर यांची पक्ष विरोधी वक्तव्यं केल्या प्रकरणात त्यांची शिवसेनेतून त्वरीत हकालपट्टी करण्याची आणि त्यांना निरोपाचा नारळ देण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे पत्रात

शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्यं केले. विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतल्याने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्याची विनंती केली.

ते तर मातोश्रीचे “लाचार श्री”

खासदार किर्तीकर मातोश्रीचे “लाचार श्री” झाले आहेत. गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. कीर्तिकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. आता गजानन कीर्तिकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

आरोपांची उडवली राळ

गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. अमोल किर्तीकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी स्वत: च्या प्रचारासाठी, विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला. मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली. त्यामुळे आता त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी उपनेते शिशिर शिंदे यांनी केली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.