Sanjay Raut : अजितदादा भाजपशी काडीमोड घेणार? संजय राऊत यांचा नेमका दावा काय?
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत यांच्या एका विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल चढवला. त्याचवेळी त्यांनी अजित पवार यांच्याविषयी मोठा दावा केला, काय म्हणाले राऊत...
रखरखत्या उन्हासोबतच राज्यात लोकसभेच्या आखाड्यात तापमान वाढले आहे. प्रत्येक जण एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहे. शाब्दिक भालेफेक सुरु आहे. तर काही ठिकाणी दारुगोळा साठवून ठेवण्यात येत आहे.वेळ पडल्यावर गोटातून तुफान हल्लाबोल चढविल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. नागपूरपासून ते कोल्हापूरपर्यंत त्यांच्या सभांचा रतीब सुरु आहे. अशातच खासदार संजय राऊत यांच्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार आणि भाजपविषयी त्यांनी दाव केला आहे. काय म्हणाले संजय राऊत…
शिंदे गटाचे लोटांगण
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली ती शिवसेना सातत्याने महाराष्ट्रात 21 , 22 जागा लढत आलेली आहेय तो आमचा आकडा कायम आहे. ते आपण पाहिलं असेल तीन पक्षांच्या जागा वाटपात सुद्धा अत्यंत सन्मानाने जागा वाटप झालं. त्यात आम्ही 21 जागा लढत आहोत. 22 वी जागा होती उत्तर मुंबईची, ती आम्ही शेवटच्या क्षणी काँग्रेसला लढण्यासाठी दिली. आता हा जो शिवसेना फडणवीस गट आहे. ते 12-13 जागा लढत आहेत, म्हणजे त्यांनी स्वतःच्या जागा कमी करून घेतल्या आहे. याला लोटांगण घालणे असे बोलतात, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.
भाजपवर केला प्रहार
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचा कधीच घेणं देणं नव्हतं. महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढत भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असेल तर ते त्यांनी दाखवावे असे आवाहन त्यांनी दिले. ना स्वातंत्र्याच्या लढ्यात, ना महाराष्ट्राच्या लढ्यात हे लोक कधीच नव्हते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र विषयी स्वाभिमान प्रेम असण्याचं कारण नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या आहेत त्याला थैलीचा राजकारण म्हणतात मुंबईचा लुटीचा मल दिल्लीच्या चरणी व्हायचा आणि महाराष्ट्रात सत्ता विभागायची हे सध्याच्या राजकर्त्यांचे धोरण आहे, असा टोला त्यांनी लगावला.
अजित पवार दैवत बदलतील
यावेळी संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठे विधान केले. अजित पवार यांनी दैवत बदलंले आहे आणि 2024 ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल, तेव्हा त्यांनी परत दैवत बदलले असेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
ही तर लाचारी
तुम्ही तुमच्या जागा कायम ठेवू शकले नाही आणि अनेक ठिकाणी जे उमेदवार भारतीय जनता पक्षाने ठरविल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाकडे स्वाभिमानाची गोष्ट नाही असा हल्लाबोल करत ही एक लाचारी आहे असल्याचे राऊत म्हणाले.