लोअर परळ पूलाची डेडलाईन पुन्हा पुढे ढकलली, आता ही आहे नविन डेडलाईन

लोअलपरळ पुलाचे काम गेली पाच वर्षे सुरूच आहे. या पुलाची डेडलाईन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. पुलाच्या पूर्व बाजूच्या एप्रोच लॅण्डचे काम पालिकेने चार महीन्यांपूर्वी सुरू केले असून ते संपल्यावरच पूल सुरू होईल असे म्हटले जात आहे.

लोअर परळ पूलाची डेडलाईन पुन्हा पुढे ढकलली, आता ही आहे नविन डेडलाईन
LOWER PARELImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 4:23 PM

मुंबई : लोअरपरळच्या ( LOWER PAREL ) पुलाची डेडलाईन पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिका ( MCGM ) आणि पश्चिम रेल्वेच्या ( WESTERN RAILWAY ) सहकार्याने होणारा हा पुल एप्रिल महिन्यात पूर्ण करण्याची नियोजन होते. परंतू काम रखडल्याने आता हा पूल पावसाळ्यानंतर पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. शहराच्या हद्दीतील काम पालिकेमार्फत सुरू असून आता हा पूल पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महीन्यात सुरू होईल असे म्हटले जात आहे.

मुंबई आयआयटी आणि रेल्वेच्या ऑडीटमध्ये हा पूल धोकादायक ठरविल्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर रेल्वेच्या सर्व पुलांचे सेफ्टी ऑडीट करण्यात आले होते. त्यानंतर या पुलाला धोकादायक ठरविण्यात आहे. गोखले पुलांच्या बांधकामासाठी तोही पुल बंद करण्यात आला आहे. त्यात आता लोअरपरळ पुलाची डेड लाईन पुढे ढकलण्यात आल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची चांगलीच कोंडी होत आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याआधी म्हटले होते की या पुलाचा एन.एम. जोशी मार्ग जवळील एप्रोच रोड जर रेल्वेने १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आमच्या ताब्यात दिला असता तर एप्रिलपर्यंत काम पूर्ण झाले असते, रेल्वे अधिकाऱ्यांनी जवळपास काम केले असले तरी डेडलाईन ऑक्टोबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पालिकेने अर्थसंकल्पात लोअरपरळ पुलाचे काम साठ टक्के पूर्ण झाले असून त्याचे संपूर्ण काम आता पावसाळ्यानंतर पूर्ण होणार असल्याचे पालिका आयुक्त ईक्बास चहल यांनी मिडे या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे.

लोअर परळ पुलाचे काम दोन यंत्रणांकडून विभागून होत आहे. रेल्वे हद्दीतील बांधकाम रेल्वेने करीत असून तीन एप्रोच रोड उत्तर आणि दक्षिण ( एन.एम. जोशी मार्ग ) आणि गणपतराव कदम मार्गावरील बाजूचे काम पालिका करीत आहे. रेल्वेच्या हद्दीतील कामासाठी पश्चिम रेल्वेने ८७ कोटीचे टेंडर मंजूर केले आहे. तर एप्रोच रोडच्या कामाचे १३८ कोटींचे टेंडर काढले आहे.

पालिकेच्या ऑगस्ट २०२२ च्या इंटर्नल अहवालात या पूलाला उशीर होण्यामागे पश्चिम रेल्वेला गर्डर टाकण्यासाठी झालेला उशीर असे म्हटले आहे. जी.के. रोडवरील सॉलीड रॅम्प आणि एन.एम. जोशी मार्गावरील उत्तर बाजूचा एप्रोच भाग बांधून झाला आहे. रेल्वेने रेल्वे रूळांवरील जुना साचा पाडून नविन वेब गर्डर टाकले आहेत. पश्चिम रेल्वेने पहीला गर्डर गेल्यावर्षी जून २०२२ मध्ये तर दुसरा गर्डर सप्टेंबरमध्ये लाॅंच केला. रेल्वेने पूर्व बाजूची एप्रोच लॅण्ड चार ऑक्टोबरला पालीकेच्या ताब्यात दिली आहे. गर्डर टाकण्यासाठी ही जागा रेल्वेने आपल्या ताब्यात घेतली होती. पालिकेने दोन्ही एप्रोच लॅंडचे काम ऑक्टोबर २०२२ पूर्वी पूर्ण केले आहे. आणि पूर्व बाजूच्या एप्रोच लॅण्डचे काम पालिकेने चार महीन्यांपूर्वी सुरू केले आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.