कोरोनापेक्षा सध्याचे राजकारण भयंकर! इतक्या वर्षात असे राजकारण पाहिले नाही, जेष्ठ साहित्यीक Madhu Mangesh Karnik यांनी व्यक्त केली नाराजी
ज्या कालखंडातून ज्या परिवर्तनाच्या अवस्थेतून देश जात आहे महाराष्ट्र जात आहे. अगदी अनेक संकट जी 20 व्या शतकात आम्ही कधी अनुभवली. किंवा कल्पना केली नाही ती संकट या 21 व्या शतकाच्या सुरुवातीलाच यायला लागली.
मुंबई – सध्याच्या घडीला राज्यात राजकारणाची पातळी खालावली असून सर्वसामान्य नागरिकांसह समाजातील थोर व्यक्तींमध्ये नाराजीचा सूर उमटत असताना दिसून येत आहे. दररोज सुरू असलेल्या नवीन घडामोडीमुळे कोरोनापेक्षा (Corona) सद्या सुरू असलेले राजकारण (Politics) भयंकर असल्याचे खंत जेष्ठ साहित्यीक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक (Madhu Mangesh Karnik) व्यक्त केले. हल्ली सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः सध्या जे राजकारण सुरू आहे ते माझ्या 90 वर्षाच्या आयुष्यात कधी असे पाहिले नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
एकवेळ कोरोनावर मात करणे शक्य, पण राजकारणावर मात करणे अशक्य
ज्या कालखंडातून ज्या परिवर्तनाच्या अवस्थेतून देश जात आहे महाराष्ट्र जात आहे. अगदी अनेक संकट जी 20 व्या शतकात आम्ही कधी अनुभवली. किंवा कल्पना केली नाही ती संकट या 21 व्या शतकाच्या सुरुवातीलाच यायला लागली. 100 वर्षापूर्वी टिळकांच्या काळत येऊन गेली. त्यानंतर आता कोरोना आला. पण समाजाचे परिवर्तन जे होत आहे वैचारिक, राजकीय आणि विशेषतः राजकारणात जी मानस आहेत. ती ज्या पद्धतीने राजकारण करत आहे. ते मी माझ्या 90 वर्षाच्या आयुष्यात कधी पहिले नसल्याची खंत जेष्ठ साहित्यीक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक व्यक्त केली आहे. हे असच चालू राहील तर एकवेळ कोरोनावर मात करणे शक्य झाले पण राजकारणावर मात करणे शक्य नसून पुढची 80 वर्ष कशी जातील. या देशाच काय होईल हे माहीत नाही आणि हेच विचार या कादंबरीमध्ये मांडले असल्याचे पद्मश्री कर्णिक यांनी सांगितले.
आपल्याला मिळालेले स्वतंत्र अबाधित राहिले पाहिजे
सकाळी पैसे खर्च करून पेपर घेतल्यानंतर यांची भांडण आणि याची एकमेकांचे दोषारोप, त्यामुळे वृत्तपत्र सकाळी उघडल्यानंतर वाचावासा वाटत नाही, अशी नाराजी यावेळी जेष्ठ साहित्यीक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक व्यक्त केली आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दररोज भांडणे, आरोप -प्रत्यारोप सुरू असून तुम्ही राज्यकारभार कधी करणार असा प्रश्न मधू मंगेश कर्णिक यांनी उपस्थित केला. प्रत्येक समाज एक असला पाहिजे, यामध्ये धर्माची लुडबुड नसली पाहिजे. मी स्वतंत्र चळवळ पहिली आहे, आपल्याला मिळालेले स्वतंत्र अबाधित राहिले पाहिजे, सर्वांनी लोकशाही प्रधान म्हणून राहिले पाहिजे अशी इच्छा कर्णिक यांनी व्यक्त केली असून आपल्या ‘प्राप्तकाल’ या कादंबरीत असे विचार मांडले असल्याचे देखील कर्णिक यांनी सांगितले..
सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्ष उतावळे
सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्ष उतावळे झाले आहेत, एकमेकांवर कुरघोडी आणि टीका करण्याची संधी राजकारणी सोडत नाहीत. नागरिकांच्या हिताचे प्रश्न बाजूला ठेवून एकमेकांवर छापेमारी सुरू असून सामान्य जनतेचा विचार करताना दिसून येते नाही, याच पार्श्वभूमीवर सद्याचे राजकारण भरकटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. कोरोना आला आपण सर्वांनी कोरोना सारख्या भयंकर आजारावर मात केली, मात्र राजकारणावर मात करणे शक्य नसल्याचे मत मधू मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत ‘प्राप्तकाल’ या कादंबरीचे प्रकाशन
कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय आणि मॅजेस्टिक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार राज्यसभा खासदार संजय राऊत, जेष्ठ अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर, जेष्ठ लेखक संजीव लाटकर, भारत सासणे, मिलिंद भागवत, जयु भाटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना कर्णिक राजकीय परिस्थिती बद्धल नाराजी व्यक्त केली.