इंपिरिकल डेटासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकष्ठा करेल, ओबीसी संघटनांच्या बैठकीत भुजबळांचं आश्वासन

इंपिरिकल डेटा मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकष्ठा करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

इंपिरिकल डेटासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकष्ठा करेल, ओबीसी संघटनांच्या बैठकीत भुजबळांचं आश्वासन
Chhagan-Bhujbal
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 3:54 PM

मुंबई : इंपिरिकल डेटा मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकष्ठा करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज मुंबईत राज्यातील विविध ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते. (Maha Govt will try hard to collect OBC Empirical Data says Chhagan Bhujbal)

यावेळी भुजबळ म्हणाले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. ओबीसी समाजाला आरक्षण हे मोठ्या संघर्षानंतर मिळाले आहे. आम्ही अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणी पासून संघर्ष केला आहे. समता परिषद सुरवातीपासूनच कायदेशीर लढाई लढत आहे. आता गेलेलं राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

ओबीसींची जनगणना करण्यासाठी आज अनेक लोक एकत्र येत आहेत. मात्र हीच भूमिका आम्ही गेले अनेक वर्षे मांडत आहोत. समता परिषदेच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. केंद्रीय पातळीवर अनेक पक्ष एकत्रित येऊन आता ही मागणी करत असल्याचे समाधान आहे. कारण मागासवर्गीयांची चळवळ जिवंत राहिली पाहिजे, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

यावेळी भेटीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाज नेमका काय आहे, आरक्षणाचा नेमका तिढा काय आहे. यासाठी राज्यभर छोट्या छोट्या सभा घेऊन हरी नरके, उत्तम कांबळे, प्रा. रावसाहेब कसबे हे लोकांना मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हा प्रश्न लोकांना समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी ओबीसी समाजासाठी एकत्र मिळून काम करणे गरजेचे आहे.

या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, किरण झोडगे, दत्तात्रय माळी, लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे , मातंग समाज आरक्षण समितीचे नारायण गालफाडे, जनहित संघर्ष सेनेचे सोमनाथ शिंदे, होलार समाज समन्वय समितीचे राजाराम ऐवाळे, सूरेश कांबळे, बाळासाहेब बंडगर, गणपत देवकाते, जगन्नाथ जानकर , परमेश्वर कोळेकर,बाळासाहेब करगळ आणि ओबीसी समाजाच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या

Narayan Rane Arrests : राणेंना पोलीस नाशिकला कोर्टात नेणार?, बंद खोलीत फक्त पोलीस आणि राणे, नेमकं काय घडलं?

नारायण राणे असे का बोलतायत? भास्कर जाधव म्हणतात, हा तर सिद्धपुरुषानं दिलेला शाप, वाचा आणखी काय म्हणाले?

Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर

(Maha Govt will try hard to collect OBC Empirical Data says Chhagan Bhujbal)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.