Sanjay Raut: अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे, पवारांच्या घरावरच्या आंदोलन प्रकरणी राऊतांचा थेट भाजपवरच सवाल

पवार साहेबांचा एसटीशी काय संबंध नाही, कोणीतरी यांच्या पाठीमागे आहे. शरद पवार देशाचे नेते आहेत, त्यांच्या घरावर हल्ला करणं योग्य नाही, तुम्ही सुद्धा आरशाचा घरात राहता हे लक्षात ठेवा, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut: अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे, पवारांच्या घरावरच्या आंदोलन प्रकरणी राऊतांचा थेट भाजपवरच सवाल
संजय राऊतImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 10:17 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे’ असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट भाजपवरच सवाल उपस्थित केले आहेत. “शरद पवार देशाचे नेते आहेत, त्यांच्या घरावर हल्ला करणं योग्य नाही, तुम्ही सुद्धा आरशाचा घरात राहता हे लक्षात ठेवा” असा इशारा संजय राऊत यांनी दिला. राज्यातील राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही यावेळी संजय राऊत यांनी केला, तसंच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी 58 कोटी रूपये जमा केले आहेत, पोलिस तुम्हाला प्रश्न विचारतील, देवाच्या पेटीत टाकलेल्या पैशाचा देखील हिशोब द्यावा लागतो, असं टीकास्त्रही संजय राऊत यांनी सोडलं.

“पवारांचा एसटीशी संबंध नाही”

पवार साहेबांचा एसटीशी काय संबंध नाही, कोणीतरी यांच्या पाठीमागे आहे. शरद पवार देशाचे नेते आहेत, त्यांच्या घरावर हल्ला करणं योग्य नाही, तुम्ही सुद्धा आरशाचा घरात राहता हे लक्षात ठेवा, असं संजय राऊत म्हणाले. ‘अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे’ असं म्हणत राऊतांनी भाजपवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

“देवाच्या पेटीत टाकलेल्या पैशाचाही हिशोब द्यावा लागतो”

किरीट सोमय्यांनी 58 कोटी रूपये जमा केले आहेत, पोलिस तुम्हाला प्रश्न विचारतील, देवाच्या पेटीत टाकलेल्या पैशाचा देखील हिशोब द्यावा लागतो, असं संजय राऊत म्हणाले.  किरीट सोमय्या अंडर ग्राऊंड झाले आहेत. लोकांना प्रश्न विचारतात, परंतु त्यांच्यावर वेळ आल्यावर का पळत आहेत, हे कायद्याचं राज्य आहे, असंही राऊत म्हणाले. ते जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते.  दोघेही अँटीसिपेटरी बेलसाठी गेले असल्याची माहिती मिळाली आहे. पण अशा जामिनासाठी तर चोर, डकैत जातात. देशद्रोही जात नाहीत. आता तेही होऊ लागलंय, अशी बोचरी टीकाही राऊतांनी केली.

रश्मी शुक्ला यांच्या इशारानुसार फोन टॅपिंग झालं आहे. मी कोणाचं नाव घेणार नाही. पोलिसांनी काय समजावून पाठवलं मला माहित नाही, पोलिसांनी जवाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवले आहेत. कर नाही त्याला डर कशाला, असंही राऊत म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

एसटी कर्मचाऱ्यांना काही लोकांनी भडकावण्याचा प्रयत्न केला, अजित पवारांचा आरोप

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय : उद्धव ठाकरे

Sharad Pawar यांच्या घरावर हल्ला नव्हे कष्टकऱ्यांचा मोर्चा, Gunratna Sadavarte यांची प्रतिक्रिया

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.