Corona Update : महाराष्ट्राला दिलासा, दोन दिवसात 700 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाचे 700 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

Corona Update : महाराष्ट्राला दिलासा, दोन दिवसात 700 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 7:52 PM

मुंबई : लॉकडाऊन वाढवूनही कोरोनाचे रुग्ण (Corona Patients Get Discharged) दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाचे 700 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे 350 आणि 354 कोरनारुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या सव्वा महिन्यात तब्बल 2899 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली (Corona Patients Get Discharged).

राज्यात 9 मार्चला पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर 25 मार्चला पहिल्यांदा पुणे येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर दररोज राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सोमवारी 4 मे रोजी पहिल्यांदाच 350 रुग्णांना, तर लगेच दुसऱ्या दिवशी 354 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक (Corona Patients Get Discharged) संख्या आहे.

साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली आहे.

दिनांक किती कोरोना रुग्णांना डिस्चार्ज?
27 मार्च24
28 मार्च26
29 मार्च35
30 मार्च39
3 एप्रिल50
4 एप्रिल52
5 एप्रिल56
6 एप्रिल66
7 एप्रिल79
8 एप्रिल117
9 एप्रिल125
10 एप्रिल188
11 एप्रिल208
12 एप्रिल217
13 एप्रिल229
14 एप्रिल259
15 एप्रिल36
16 एप्रिल5
17 एप्रिल31
18 एप्रिल34
19 एप्रिल142
20 एप्रिल65
21 एप्रिल150
22 एप्रिल 67
23 एप्रिल51
24 एप्रिल117
25 एप्रिल119
26 एप्रिल112
27 एप्रिल94
28 एप्रिल106
29 एप्रिल205
30 एप्रिल180
1 मे106
2 मे121
3 मे115
4 मे350
5 मे 354

राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात 460 रुग्ण गेल्या दोन दिवसात घरी गेले आहेत. त्यापाठोपाठ पुणे मंडळात 213 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी (Corona Patients Get Discharged) सांगितले.

संबंधित बातम्या :

मुंबईचं कुटुंब गावात अडकलं, कुटुंबाने लॉकडाऊन सार्थकी लावला, 20 दिवसात विहीर खोदली

मुंबईत काम करणाऱ्यांची प्रवेशबंदी रद्द, नोकरदारांची मुंबईत सोय होईपर्यंत निर्णय स्थगित

मुंबईत असंच सुरु राहीलं, तर आर्मी बोलवावी लागेल, मग नागरिकांच्या अडचणी वाढतील : किशोरी पेडणेकर

लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ, पुण्यात बस चालकाची आत्महत्या

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.