राजकारणातील मोठी बातमी, माजी पोलीस आयुक्त संजय पांडे करणार ‘या’ पक्षात प्रवेश, विधानसभेचे तिकीट पक्कं

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार पुढे येत आहेत. अशातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

राजकारणातील मोठी बातमी, माजी पोलीस आयुक्त संजय पांडे करणार 'या' पक्षात प्रवेश, विधानसभेचे तिकीट पक्कं
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 12:33 PM

Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Pandey : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार पुढे येत आहेत. अशातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे ते वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे.

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राजकीय इनिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे माजी पोलिस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय पांडे हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी 4 च्या सुमारास संजय पांडे हे काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. संजय पांडे यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत पार पडेल.

वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचाराची सुरुवात

संजय पांडे यांनी काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर एक पोस्टही शेअर केली होती. त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केल्याचे म्हटलं होतं. “आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचाराची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू…”, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर अनेक जण संजय पांडे कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबद्दल तर्क-वितर्क लढवत होते. अखेर आता ते काँग्रेसमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

संजय पांडेंना बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात झालेली अटक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आले होते. संजय पांडे यांच्या कंपनीनं जवळपास 8 वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करुन या कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीनं केला होता.

याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक करण्यात आली होती. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सीबीआय आणि ईडीनं त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केली होती. या चौकशीनंतर संजय पांडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. संजय पांडे हे 1986 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले आहे.

'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.