AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Winner Candidate List : मुंबईतल्या 36 जागांचा निकाल एका क्लिकवर, बघा तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं?

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 : महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यात मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. यंदा मुंबईतील निवडणुका खूप इंटरेस्टिंग आहेत. मुंबईत कोण बाजी मारणार? याची उत्सुक्ता आहे. मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी तुम्ही एका क्लिकवर पाहू शकता.

Mumbai Winner Candidate List : मुंबईतल्या 36 जागांचा निकाल एका क्लिकवर, बघा तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं?
Maharashtra Assembly Election 2024 Mumbai Result
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 1:01 PM

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्राबरोबर मुंबईच्या निकालाकडेही सगळ्यांच लक्ष लागलं आहे. मुंबई कोणाची? याचा आज निर्णय होईल. काही वर्षांपूर्वी मुंबईत शिवसेनेच एकहाती वर्चस्व होतं. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कामकाज पहायचे, त्यावेळी सगळ्या मुंबापुरीत शिवसेनेचा आवाज होता. पण आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. मुंबईत आता भाजपाने सुद्धा आपला जनाधार वाढवला आहे. मागच्या दोन विधानसभा 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत हे दिसून आलं. मुंबईत विधानसभेचे एकूण 36 मतदारसंघ आहेत. यात मुंबई उपनगरात 26 आणि मुंबई शहरात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 साली शिवसेना एकसंध असताना शिवसेना-भाजपाने युती म्हणून एकत्र निवडणूक लढवली. त्यावेळी युतीने एकूण 29 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपा यांच्या वाट्याला फक्त सात जागा आल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेचे 14 आणि भाजपाचे 16 आमदार निवडून आले होते.

आज जाहीर होणाऱ्या निकालात शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोण चांगलं प्रदर्शन करतं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदर्शन कसं असेल? याकडे राज्याच लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जागा जिंकणार? की मत विभाजनाने खेळ बिघडवणार? हे सुद्धा महत्त्वाच ठरणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार उभे केले नव्हते, त्यामुळे मनसेची सध्याची ताकद काय? याचा कोणालाच अंदाज नाहीय. मुंबईत 36 जागांसाठी एकूण 420 उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबईत किती जागांवर शिवसेना शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट सामना?

महाविकास आघाडीत मुंबईत उद्धव ठाकरे गट सर्वाधिक 22 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी यांचे 11 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गट 15 आणि भाजपाने 18 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 3 जागा आहेत. मुंबईत 11 जागांवर शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना असा थेट सामना आहे. 9 जागांवर उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना आहे. भाजप आणि काँग्रेस सात जागांवर आमने-सामने आहे.

मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी

विधानसभा मतदारसंघउमेदवाराचे नाव पक्ष
कुलाबा विधानसभाराहुल नार्वेकर विजयीभाजप
मलबार हिल विधानसभामंगलप्रभात लोढा विजयीभाजप
मुंबादेवी विधानसभाअमिन पटेल विजयीकाँग्रेस
भायखळा विधानसभामनोज जामसूतकर विजयीउद्धव ठाकरे गट
शिवडी विधानसभा अजय चौधरी विजयी उद्धव ठाकरे गट
वरळी विधानसभा आदित्य ठाकरे विजयी उद्धव ठाकरे गट
माहीम विधानसभा महेश सावंत विजयीउद्धव ठाकरे गट
वडाळा विधानसभाकालिदास कोळंबकर विजयी भाजप
सायन-कोळीवाडा तमिल सेल्वन विजयी भाजप
धारावी विधानसभाज्योती गायकवाज विजयी काँग्रेस
चेंबूर विधानसभा तुकाराम काते विजयीशिवसेना
अणुशक्ती नगर विधानसभा सना मलिक विजयीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
वांद्रे पश्चिम विधानसभा आशिष शेलार विजयी भाजप
वांद्रे पूर्व विधानसभा वरुण सरदेसाई विजयीउद्धव ठाकरे गट
कलिना विधानसभा संजय पोतनीस विजयीउद्धव ठाकरे गट
कुर्ला विधानसभा मंगेश कुडाळकर विजयी शिवसेना
चांदिवली विधानसभा दिलीप लांडे शिवसेना
विलेपार्ले विधानसभा पराग अळवणी विजयीभाजप
मानखुर्द-शिवाजीनगरअबू आझमी विजयीसमाजवादी पार्टी
घाटकोपर पूर्व विधानसभा पराग शाह विजयीभाजप
घाटकोपर पश्चिम विधानसभा राम कदम विजयी भाजप
भांडूप पश्चिम विधानसभा अशोक पाटील शिवसेना
विक्रोळी विधानसभा सुनील राऊत विजयीउद्धव ठाकरे गट
मुलुंड विधानसभा मिहिर कोटेचा विजयीभाजप
अंधेरी पूर्व विधानसभा मुरजी पटेल विजयीशिवसेना शिंदे गट
अंधेरी पश्चिम विधानसभा अमित साटम विजयी भाजप
वर्सोवा विधानसभा हारुन खान विजयी उद्धव ठाकरे गट
गोरेगाव विधानसभा विद्या ठाकूर विजयी भाजप
दिंडोशी विधानसभा
जोगेश्वरी पूर्व विधानसभा अनंत नर विजयीउद्धव ठाकरे गट
मालाड विधानसभा अस्लम शेख विजयी काँग्रेस
चारकोप विधानसभा योगेश सागर विजयीभाजप
कांदिवली विधानसभा अतुल भातखळकर विजयीभाजप
मागाठाणे विधानसभा प्रकाश सुर्वे विजयीशिवसेना शिंदे गट
दहीसर विधानसभा मनिषा चौधरी विजयीभाजप
बोरिवली विधानसभा संजय उपाध्याय विजयीभाजप

लोकसभा निवडणुकीत मुंबईत कोणी जास्त जागा जिंकल्या?

लोकसभा निवडणूक 2024 चे मुंबईतील निकाल बघितले, तर विधानसभा क्षेत्रनिहाय 36 पैकी 20 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड आहे, तर 16 विधानसभा क्षेत्रात महायुतीला लीड आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 4 तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. यात शिवसेना ठाकरे गटाचे तीन आणि काँग्रेसचा एक खासदार निवडून आला. महायुतीमध्ये भाजपाने एक आणि शिंदे गटाने एक जागा जिंकली.

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.