Maharashtra Govt Formation: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल ते शपथविधीपर्यंत कोणत्या दिवशी काय, काय घडले?

Maharashtra Govt Formation: मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून शपथविधीच्या कार्यक्रमात कोणत्या दिवशी काय, काय घडले पाहू या...

Maharashtra Govt Formation: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल ते शपथविधीपर्यंत कोणत्या दिवशी काय, काय घडले?
महायुतीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 2:20 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून बारा दिवसांनी महायुतीच्या सरकारच्या शपथविधी आज होत आहे. विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला बहुमत मिळल्यानंतर तब्बल दहा दिवस मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट होत नव्हते. अखेर चार डिसेंबर रोज देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणीस ५ डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून शपथविधीच्या कार्यक्रमात कोणत्या दिवशी काय, काय घडले पाहू या…

कोणत्या दिवशी काय घडले

  1. २३ नोव्हेंबर : निकालानंतर अमित शाह यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी फोनवर चर्चा
  2. २३ नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी फोनवर चर्चा
  3. २४ नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय
  4. २४ नोव्हेंबर : शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले
  5. २६ नोव्हेंबर : विधानसभेचा कालावधी संपल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा राज्यपालांकडे राजीनामा, राज्यपालांनी त्यांनी हंगामी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्याचे सांगितले.
  6. २८ नोव्हेंबर : दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या घरी भेट घेत अर्धा तास चर्चा केली.
  7. २८ नोव्हेंबर : अमित शाह यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक. फडणवीस आणि पवार मुंबईत परतले. शिंदे मुंबईत थांबले.
  8. २९ नोव्हेंबर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपालांची भेट घेऊन ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी होणार असल्याचे सांगितले.
  9. ३० नोव्हेंबर : एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावी रवाना, प्रकृती खराब असल्याचे कारण, दोन दिवस गावातच थांबले
  10. २ डिसेंबर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी भाजपचे निरीक्षक नियुक्त
  11. ३ डिसेंबर : भाजपचे दोन्ही निरीक्षक मुंबईत दाखल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत
  12. ४ डिसेंबर : देवेंद्र फडणवीस विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड. दुपारी राज्यपालाकडे सरकार स्थापन करण्याचा दावा
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.