राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक; अपात्रतेच्या निकालाच्या तीन दिवस आधीच मोठी खलबतं?

येत्या 10 जानेवारी रोजी म्हणजे तीन दिवसानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हेच या निर्णय देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांची भेट होत असल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही नेत्यांच्या बैठकीत प्रामुख्याने आमदारांच्या अपात्रतेवरच चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नेमकी काय चर्चा होणार? हा तपशील गुलदस्त्यात आहे. तीन दिवसांवर निकाल आला आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक; अपात्रतेच्या निकालाच्या तीन दिवस आधीच मोठी खलबतं?
rahul narwekar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 2:33 PM

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 7 जानेवारी 2024 : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाला अवघे तीन दिवस उरले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच निर्णय देणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. या निकालापूर्वीच राहुल नार्वेकर आजारी पडल्याने विरोधकांनी त्यावरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांचं आजारी पडणं हा सुद्धा राजकीय भूकंपाचा भाग असल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्यानंतर आता अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट सुरू असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बैठकीत काय चर्चा होणार? अशी चर्चा केली जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी आहेत. आजारी असूनही नार्वेकर हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची भेट ठरलेली नव्हती. पण अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ही गुप्त भेट होती. पण मीडियाला या भेटीची कुणकुण लागली. वर्षा बंगल्यावर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात बैठक सुरू आहे. तिसरा कोणताही नेता यावेळी उपस्थित नाही. दोन्ही उपमुख्यमंत्रीही या बैठकीत नाहीये, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नार्वेकरच देणार निर्णय

येत्या 10 जानेवारी रोजी म्हणजे तीन दिवसानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हेच या निर्णय देणार आहेत. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. उद्या शिंदे गटाच्या विरोधात निकाल गेला तर शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं. त्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यापूर्वीच नार्वेकर हे वर्षावर दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

चर्चा गुलदस्त्यात

दोन्ही नेत्यांच्या बैठकीत प्रामुख्याने आमदारांच्या अपात्रतेवरच चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नेमकी काय चर्चा होणार? हा तपशील गुलदस्त्यात आहे. तीन दिवसांवर निकाल आला आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडी काय असतील हे दोन दिवसातच दिसून येईल, असं राजकीय वर्तुळातून सांगितलं जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.