Bhavya Kashi, Divya Kashi: भाजपचा राज्यभरात ‘दिव्य काशी, भव्य काशी’ कार्यक्रम; फडणवीस, पाटील, मुंडे सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण होत आहे. त्यानिमित्ताने राज्यात 'दिव्य काशी, भव्य काशी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण होत आहे. त्यानिमित्ताने राज्यात ‘दिव्य काशी, भव्य काशी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आ.प्रा.देवयानी फरांदे, आ. अतुल सावे आदी सहभागी होणार आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आ.मंगलप्रभात लोढा, आ.आशीष शेलार , प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग हे मुंबईत, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुणे येथे, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथे, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर येथे, माजी मंत्री गिरीश महाजन जळगाव येथे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे हे शेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाग घेणार आहेत.
तुषार भोसले 50 साधूंसह वाराणासीत
परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, घृष्णेश्वर आणि भीमाशंकर या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात अनुक्रमे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार अतुल सावे, ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे हे भाग घेणार आहेत. वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले हे राज्यातील 50 साधू संतांसह सहभागी होणार आहेत.
अथर्वशीर्ष पठण व रुद्राभिषेक
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते काशी विश्वनाथ धामचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानिमित्ताने नगरसेवक अतुल शाह यांनी सकाळी 11 वा., माधव बाग मंदिर येथे प्रथम स्वच्छता अभियान आयोजित केले आहे. त्यानंतर अथर्वशीर्ष पठण व रुद्राभिषेक आणि त्यानंतर काशी विश्वनाथ धाम येथून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण माधवबाग मंदिर येथे दुपारी 12 वाजल्यापासून दाखविण्यात येणार आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप https://t.co/JEK8IoGmTv #SanjayRaut | #Delhi | #BJP | @rautsanjay61 | @BJP4India
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2021
संबंधित बातम्या:
Sanjay Raut: ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात: संजय राऊत