Maharashtra News Live | आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही – छगन भुजबळ

| Updated on: Feb 09, 2024 | 7:12 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 8 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

Maharashtra News Live | आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही - छगन भुजबळ

मुंबई, दि. 8 फेब्रुवारी 2024 | दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं. दोन्ही बाजूंनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर आता शरद पवार गटाला नवीन नाव मिळाल आहे. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार अशा तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यापैकी निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या नावाला मान्यता दिली आहे. आता हे नवीन नाव घेऊन पवार गट राजकारणाच्या मैदानात उतरेल. हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत 27 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन नाव आणि चिन्ह घ्यावं लागेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Feb 2024 06:57 PM (IST)

    आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही. वसंत मोरेंच स्टेटस मी पाहिल नाही-साईनाथ बाबर

    आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही. वसंत मोरेंच स्टेटस मी पाहिल नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असेल कारण अंतिम निर्णय हा राज ठाकरे यांचा असेल. अनेकजण इच्छुक आहेत पक्षासाठी काम करतायेत, त्याचा पक्षाला फायदाच होईल असं मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी म्हटलं आहे.

  • 08 Feb 2024 06:45 PM (IST)

    काँग्रेसकडून राज्यसभेसाठी माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

    राज्यसभेसाठी माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावावर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

  • 08 Feb 2024 06:21 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत

    नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांच्या हस्ते देवळा गावातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

  • 08 Feb 2024 06:10 PM (IST)

    लोक सोडून गेले तरी मतदार जाग्यावर असतात म्हणून…- जयंत पाटील

    लोक सोडून गेले तरी मतदार जाग्यावर असतात म्हणून तुम्ही बूथ कमिटी बनवा. पक्षाच्या प्रचाराला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी बूथ कमिटी बनवा. जयंत पाटलांनी केला शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार जाहीर, अमोल कोल्हे हे असणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार त्याच्या विजयासाठी बूथ कमिटी मजबूत करा, असं जयंत पाटील म्हणाले.

  • 08 Feb 2024 04:52 PM (IST)

    राहुल गांधींनी जातींचा अभ्यास करावा : केंद्रीय मंत्री

    राहुल गांधींनी आधी जातींचा अभ्यास करावा, असे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी म्हटले आहे. तेली जातीचे लोक कोणत्या वर्गात येतात हे त्यांना माहीत नाही. तेली समाजाचे लोक ओबीसी प्रवर्गात येतात आणि पंतप्रधान मोदी याच समाजातील आहेत. राहुल गांधींना देश आणि समाजाबद्दल काहीच माहिती नाही.

  • 08 Feb 2024 04:35 PM (IST)

    लोकसभा निवडणुकीसाठी आपने 3 उमेदवारांची केली घोषणा

    आम आदमी पार्टीने आसाममधील लोकसभेच्या 3 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आम आदमी पार्टीचे संघटन सरचिटणीस आणि खासदार संदीप पाठक म्हणाले की, लोकसभा निवडणूक अगदी जवळ आली आहे. फार कमी वेळ शिल्लक आहे.

  • 08 Feb 2024 04:25 PM (IST)

    भाजप आणि आरएलडी यांच्यातील युतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात

    भाजप आणि आरएलडी यांच्यातील युतीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आरएलडीने लोकसभेच्या 4 जागा मागितल्या आहेत, तर भाजपने दोन जागा देऊ केल्या आहेत. आरएलडीला 2 लोकसभा आणि 1 राज्यसभेची जागा मिळू शकते.

  • 08 Feb 2024 04:10 PM (IST)

    हरियाणातील खट्टर सरकारविरोधात काँग्रेस अविश्वास प्रस्ताव आणणार

    हरियाणातील खट्टर सरकारविरोधात काँग्रेस विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. या संदर्भात काँग्रेस आमदारांनी हरियाणा विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अविश्वास ठराव मांडण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 08 Feb 2024 03:56 PM (IST)

    काही खोडसाळ लोकांनी ध च मा केला – भुजबळ

    मुंबई : जरांगे पाटील स्वतःला काय समजतो मला कळत नाही. लोकशाही आहे की हुकुमशाही? त्या जरांगेला म्हणावं मुख्यमंत्र्यांना विचार. काल नाभिक समाजाच्या संघटनांनी सांगितलं की आम्ही बैठकीला हजर होतो. मराठा समाजावर बहिष्कार टाकावा असं भुजबळ कुठेही बोलले नाही. एका सोशल मीडियावर पोस्ट आली. काही खोडसाळ लोकांनी ध च मा केला.

  • 08 Feb 2024 03:51 PM (IST)

    महानगर पालिकेच्या बसने दिली सात वाहनांना धडक, मोठा अपघात

    नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेच्या बसने खोपटा कोप्रोली रस्त्यावर एकाचवेळी सात वाहनांना धडक दिली. या अपघातात एक जण ठार झालं आहे तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या बसने एका पाठोपाठ एक अशा सात वाहनांना धडक दिली. गंभीर व्यक्तीला उपचारासाठी नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे. संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले.

  • 08 Feb 2024 03:44 PM (IST)

    मोठ्या ताई एकाच बाजूने विचार करतात, चित्रा वाघ यांची टीका

    वर्धा : जो काही त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे तो काही गोष्टी त्याच्या काही कॅटेगिरी असतील, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. आता त्यामध्ये आमच्यावर अन्याय झाला किंवा लोकशाहीचा गळा दाबला आहे असं बरंच काही म्हणत असतील आणि सुप्रीम कोर्टात जाणार असेल तर त्यांनी पुढे जावे, दाद मागावी अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलीय.

  • 08 Feb 2024 03:30 PM (IST)

    खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतला मोठा निर्णय

    शिरूर : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचा संदेश दिलाय. नारायणगाव येथील कार्यालयावरील राष्ट्रवादि काँगेस पक्षाचे नाव आणि चिन्ह खासदार कोल्हे यांनी हटवले आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिन्ह अजित पवारांकडे दिल्यानंतर खासदार कोल्हे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला.

  • 08 Feb 2024 03:18 PM (IST)

    माजी आमदार परशुराम उपरकर यांची पक्षातून हकालपट्टी

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. परशुराम उपरकर हे कोकण विभाग मनसेचे सहसचिव म्हणून कार्यरत होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यापासून माजी आमदार परशुराम उपरकर हे त्यांच्यासोबत होते. मनसे नेते शिरीष सावंत यांनी उपरकर यांचा मनसेसोबत कोणताही सबंध नसल्याचं पत्र दिलंय.

  • 08 Feb 2024 03:04 PM (IST)

    शिंदे गटाच्या खासदारासमोरच भाजप कार्यकत्यांची मागणी, चांगला उमेदवार द्या…

    रामटेक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच भाजप पदाधिकाऱ्यांनी खासदारपदाचे उमेदवार बदलण्याची मागणी केली. यामुळे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांच्यासह भाजप नेत्यांची गोची झाली. भाजपच्या गाव चलो अभियान अंतर्गत रामटेक लोकसभा मतदारसंघातील पारडसिंगा बूथ प्रमुखांशी चर्चेदरम्यान ही मागणी करण्यात आली.

  • 08 Feb 2024 02:59 PM (IST)

    आदिवासींचा बिऱ्हाड मोर्चा

    जळगावात आदिवासी तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लोकसंघर्षतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने आदिवासी तसेच शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. आदिवासी वेशभूषेतील तसेच नृत्य करत आंदोलनात सहभागी आदिवासी महिला तसेच पुरुष बांधवांनी लक्ष वेधले.

  • 08 Feb 2024 02:57 PM (IST)

    बागेश्वर बाबा-फडणवीस यांची भेट

    बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि देवेंद्र फडणवीसांची पुणे विमानतळावर भेट झाली. बागश्वेर बाबा पुणे विमानतळावर असल्याचं कळल्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली.

  • 08 Feb 2024 02:42 PM (IST)

    खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात तक्रार

    शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. हेमंत पाटील यांच्याकडून कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याला धमकी देण्यात आली. याप्रकरणी हेमंत पाटील यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कृषी आयुक्तालयातील सहसंचालकाला हेमंत पाटील यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • 08 Feb 2024 02:31 PM (IST)

    तू खरा पाटील असशील तर मंडल आयोगाला चॅलेंज कर

    जरांगे तू खरा पाटील असशील तर मंडल आयोगाला आव्हान दे, अशी खरमरीत टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली. ओबीसीमध्ये आरक्षण घ्यायचं आणि आता मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा करायची, अशी टीका त्यांनी केली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.

  • 08 Feb 2024 02:26 PM (IST)

    मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या

    मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. मनोज जरांगे यांच्या अल्टिमेटमवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे स्वतःला काय समजतात, अशी विचारणा त्यांनी केली. ही लोकशाही आहे की हुकूमशाही असा सवाल त्यांनी केला.

  • 08 Feb 2024 02:16 PM (IST)

    बीडमध्ये पदाधिकाऱ्यांचा बॅनरबाजीतून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या वाढदिवस आहे. आणि त्याच निमित्ताने बीडमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनरबाजी केली आहे. मात्र बॅनर वर पदाधिकाऱ्यांनी स्वतचाच फोटो लावला आहे. तीन जिल्हा प्रमुख आणि एका माजी मंत्र्याने ही बॅनर बाजी केली आहे. औपचारिकता म्हणून या चौघांनी एकमेकांचा फोटो देखील वापरला नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या वादाची चर्चा बीडमध्ये सध्या जोरात सुरू आहे.

  • 08 Feb 2024 02:01 PM (IST)

    आज सर्व आरक्षण धोक्यात

    आज सर्व आरक्षण  धोक्यात आले आहे. सुरुवातीला काँग्रेस सरकारने जातीय गणना केली होती. 10 वर्षांनी जनगणा होत असते. आम्ही कधी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. पृथ्वीरज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे CM असताना प्रयत्न झाल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

  • 08 Feb 2024 01:37 PM (IST)

    शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा होण्याची शक्यता

    शरद पवार दिल्लीतून आल्यानंतर पुढच्या आठवड्यात लागणार कामाला. शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा होण्याची शक्यता आहे. १५ ,१६ आणि १७ तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघात ते दौरा करणार आहेत. १८ तारखेला पवारांचा पुरंदर दौरा असणार आहे. २१ तारखेला आंबेगाव दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात दौरा असणार आहे, लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात उतरणार आहेत. आतापासून पवारांच्या दौऱ्याला सुरुवात होणार असल्याची माहिती टीव्ही ९ मराठीला सूत्रांनी दिली आहे.

  • 08 Feb 2024 12:50 PM (IST)

    बाबा सिद्दीकी यांच्या प्रवेशाचे बॅनर लागले

    बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांचे अजित पवार गटात पक्ष प्रवेशाचे बॅनर लागले आहे.

  • 08 Feb 2024 12:38 PM (IST)

    बीडमध्ये धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक

    आरक्षणाच्या मुद्यावरून धनगर समाज बीडमध्ये आक्रमक झालेले आहे. यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोन्नर यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • 08 Feb 2024 12:34 PM (IST)

    कुणाल राऊत यांच्यावर कारवाईची मागणी

    कुणाल राऊत यांच्यावर भाजप युवा मोर्चाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सावरकरांचा प्रतिकात्मक पुतळा विद्यापीठ परिसरात जाळल्या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

  • 08 Feb 2024 12:31 PM (IST)

    कोण गेला म्हणजे पक्ष घेऊन गेला असं होत नाही- वडेट्टीवार

    बाबा सिद्दकी यांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. कोण गेला म्हणजे पक्ष घेऊन गेला असं होत नाही म्हणजे पक्ष घेऊन गेला असं होत नाही.

  • 08 Feb 2024 12:25 PM (IST)

    वंचित आघाडीकडून मविआला उद्या मसुदा दिला जाणार

    वंचित आघाडीकडून मविआला उद्या मसुदा दिला जाणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी हा मसुदा दिला जाईल.

  • 08 Feb 2024 12:19 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. विविध विकास कामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.

  • 08 Feb 2024 12:11 PM (IST)

    साळवी कुटूंबाच्या जामिन अर्जावर सुनावणी पुढे ठकलली

    साळवी कुटूंबाच्या जामिन अर्जावर उद्या सुनावणी सोमवारी होणार आहे. सरकारी वकील अनुपस्थित असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

  • 08 Feb 2024 11:50 AM (IST)

    अंपायर वगैरे सगळे ठरलेले होते, फक्त हात कधी वर करायचं बाकी होतं- अंबादास दानवे

    कोल्हापूर-  “अंपायर वगैरे सगळे ठरलेले होते. केवळ हात कधी वर करायचं बाकी होतं. तो त्यांनी परवा केला. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं ते जगाला आणि राज्याला माहीत आहे. तशी राष्ट्रवादी काँग्रेस ही कोणाची आहे सर्वांना माहीत आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी असताना बहुमताच्या जोरावर अशा पद्धतीचा निकाल दिला. लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात काम करणारा नोकर झाला आहे,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

  • 08 Feb 2024 11:40 AM (IST)

    राज्यसभेतील 56 खासदारांचा आज निरोप

    राज्यसभेतील 56 खासदारांचा कार्यकाळ संपला असून हे खासदार आज निरोप घेणार आहेत. याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “डॉ. मनमोहन सिंह यांचं योगदान देश विसरणार नाही. ते व्हीलचेअरवर असतानाही मतदानासाठी आले होते.”

  • 08 Feb 2024 11:30 AM (IST)

    पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गट दावा करण्याची शक्यता

    भविष्यात पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गटाचा दावा करण्याची शक्यता आहे. पुण्यातील शहर कार्यालय प्रशांत जगताप यांच्या नावावर असल्यामुळे अजित पवार गटाला कायदेशीर दावा करता येणार नाही. अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे. सदरील जागा जगताप यांनी भाडेतत्त्वावर घेतल्यामुळे अजित पवार गटाला दावा करता येणार नाही.

  • 08 Feb 2024 11:20 AM (IST)

    10 तारखेपासून उपोषण करणार- मनोज जरांगे पाटील

    मनोज जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी ते उपोषणाबद्दल म्हणाले, “10 तारखेला मी उपोषण करणार आहे. 2001 च्या कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचना काढली. येत्या 15 तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनात अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं. यासाठी 10 तारखेपासून उपोषण करणार आहे.”

  • 08 Feb 2024 11:10 AM (IST)

    नाशिक जिल्हा हा जनतेचा बालेकिल्ला- मनोज जरांगे पाटील

    “गेल्या दोन दिवसांपासून माझा दौरा सुरू आहे. आज नाशिक जिल्ह्यात आहे. देवीचं देखील दर्शन घेणार आहे. बालेकिल्ला आणि फालेकिल्ला कुणाचा नसतो. नाशिक जिल्हा हा जनतेचा बालेकिल्ला आहे,” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

  • 08 Feb 2024 10:53 AM (IST)

    काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा, ट्विट करत दिली माहिती

    काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली. गेल्या 48 वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. आता ते अजित पवार गटात जाण्याची चर्चा सध्या सुरू आहे.

  • 08 Feb 2024 10:43 AM (IST)

    INDIA आघाडीची दिल्लीत एकत्र बैठक होणार, उद्धव ठाकरे, शरद पवार राहणार उपस्थित

    INDIA आघाडीची दिल्लीत एकत्र बैठक होणार. बैठकीला राज्यातून उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित राहणार.  जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीत होणार. याच महिन्यात ही बैठक होण्याची शक्यता

    या महिन्यात INDIA आघाडीची एकत्र सभा होण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्रात पहिली सभा होण्याची शक्यता असून मुंबईत सभा व्हावी असा महाराष्ट्रातील नेत्यांचा प्रयत्न आहे. सभेला INDIA आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती.

  • 08 Feb 2024 10:29 AM (IST)

    सोलापूर – आंतरराष्ट्रीय बिमस्टेक स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशी हिने भारतासाठी पटकावलं सिल्व्हर मेडल

    आंतरराष्ट्रीय बिमस्टेक स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशी हिने भारतासाठी सिल्व्हर मेडल पटकावले . दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय बिमस्टेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जलतरण , वॉटर पोलो, आणि डायव्हिंग इव्हेंट मधील वीस वर्षाखालील वयोगटातील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

    या स्पर्धेतील डायव्हिंग या क्रीडा प्रकारामध्ये सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना 234 गुणांसह सिल्व्हर मेडल पटकावले आहे.

  • 08 Feb 2024 10:05 AM (IST)

    भुजबळ राजीनामा देणारे नाहीत, दुसऱ्यांचा राजीनामा घेणारे आहेत – मनोज जरांगे पाटील

    भुजबळ हे राजीनामा देणार नाहीत, दुसऱ्यांचा राजीनामा घेणार आहेत. असं द्या म्हणून ते राजीनामा देत बसत नाहीत, मनोज जरांगे यांची टीका. मी त्यांच्याइतका खालच्या थराला जाणार नाही. त्यांनी नाभिक समाजाची माफी मागितली पाहिजे, जरांगेंची मागणी.

  • 08 Feb 2024 09:55 AM (IST)

    मोदी चीन घुसखोरीवर बोलत नाही- राऊत

    मोदी काश्मिरी पंडीत, चीन घुसखोरी या विषयावर बोलत नाही. मणिपूरचा विषयावर मोदी बोलत नाही. जुना इतिहास तोडून पुन्हा मांडत आहे, असा आरोपी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

  • 08 Feb 2024 09:45 AM (IST)

    Marathi News | त्यानंतर मोदी कोणाला आठवणार नाही – संजय राऊत

    येत्या २०२४ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठवणही कोणाला राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 08 Feb 2024 09:38 AM (IST)

    Marathi News | कल्याणमध्ये वाहतूक कोंडी

    कल्याण मलंगड रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या अर्धा तासापासून वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे कल्याण चक्की नाका परिसरात वाहतूक पोलिसांच्या कार्यालया बाहेरच दोन ॲम्बुलन्स अडकल्याची घटना घडल्याने नागरिक संपत्ती झाले आहेत.

  • 08 Feb 2024 09:22 AM (IST)

    Pune News : निखिल वागळे यांची शुक्रवारी सभा

    निखिल वागळे यांची उद्या दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी स्मारक येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ही सभा उधळून लावण्याचा इशारा भारतीय भाजपने दिला आहे. या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केलीय.

  • 08 Feb 2024 09:08 AM (IST)

    Pune News : वसंत मोरे यांची लोकसभा निवडणुकीची तयारी

    वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली. आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणार स्टेटस त्यांनी ठेवले आहे. पुणे की पसंत मोरे वसंत ! असे त्यांनी स्टेटस ठेवले आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेत इच्छुकांची संख्या वाढली. त्यामुळे वसंत मोरे यांच्याकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे.

  • 08 Feb 2024 08:57 AM (IST)

    कल्याण मलंगड रस्त्यावर वाहतूक कोंडी

    कल्याण मलंगड रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.  गेल्या अर्धा तासापासून वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालक त्रस्त आहेत.  विशेष म्हणजे कल्याण चक्की नाका परिसरात वाहतूक पोलिसांच्या कार्यालया बाहेरच दोन ॲम्बुलन्स अडकल्याची घटना घडल्याने नागरिक संतप्त झालेत.

  • 08 Feb 2024 08:45 AM (IST)

    रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

    काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला आहे.  २६ तारखेला पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी महापालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ करण्यात आली होती.  त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. २६ तारखेला सिद्धार्थ शिरोळे यांच्या मतदारसंघात आंदोलन काँग्रेसने केलं होतं.

  • 08 Feb 2024 08:30 AM (IST)

    रोहित पवार यांची पुन्हा ईडी चौकशी

    आमदार रोहित पवार यांची पुन्हा ईडी चौकशी होणार आहे.  तर रोहित पवार स्वतः न जाता वकिलांन मार्फत कागदपत्रे पाठवणार आहे. आज ईडी कार्यालयात रोहित पवारांचे वकील कागदपत्रे घेऊन हजर होतील.  दोन वेळा रोहित पवार झाले होते हजर मात्र यावेळी फक्त कागदपत्रे घेऊन बोलावले आहे.

  • 08 Feb 2024 08:15 AM (IST)

    साडेपाच हजार ओबीसींना घरकुलांची लॉटरी मिळणार

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील साडेपाच हजार ओबीसींना घरकुलांची लॉटरी मिळणार आहे. ओबीसी तसेच विशेष मागास प्रवर्गातील 5812 कुटुंबीयांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्याचं उद्दिष्ट आहे. दोन महिन्यात 5452 कुटुंबीयांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. जवळपास साडेतीन हजार कुटुंबीयांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. प्रत्येकी एक लाख वीस हजारांचा निधी दिला जाणार आहे.

  • 08 Feb 2024 07:56 AM (IST)

    Maharashtra News | आरक्षणसाठी चढला मोबाइल टॉवरवर

    बुलढाण्यात धनगर समाजाचा कार्यकर्ता आरक्षणसाठी चढला मोबाइल टॉवरवर. आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही. टॉवर वर चढून शोले आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या टॉवर वर चढला कार्यकर्ता.

  • 08 Feb 2024 07:45 AM (IST)

    Pune news | वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी

    आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणार स्टेटस. आता सगळेच म्हणू लागलेत, पुणे की पसंत मोरे वसंत !. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेत इच्छुकांची संख्या वाढली. मात्र वसंत मोरेंकडून जोरदार तयारी

  • 08 Feb 2024 07:26 AM (IST)

    Maharashtra News | विशेष अधिवेशनासंदर्भात मोठी बातमी

    महाराष्ट्र सरकारची अधिवेशन घेण्याची तयारी आहे का ?. राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विधीमंडळाला विचारणा. विधिमंडळाने तयारी असल्याची माहिती राज्यपाल रमेश बैस यांना कळवली. राज्यपाल जेव्हा तारीख अवगत करतील तेव्हा विशेष अधिवेशन होईल. निलम गोऱ्हे यांची माहिती.

  • 08 Feb 2024 07:25 AM (IST)

    Maharashtra News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील कार्यक्रमाला मुख्यमंत्री लावणार हजेरी. पोलीस अकादमी क्रीडा स्पर्धांचे आयोजन. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा करणार मुख्यमंत्री शुभारंभ.

Published On - Feb 08,2024 7:24 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.