मुबंईच्या नाईट कर्फ्यूचा फटका रो-रो पर्यटकांना, 12-13 प्रवासी अलिबागच्या माडंवा पोर्टवर अडकले

| Updated on: Dec 27, 2020 | 11:56 PM

मुबंईच्या नाईट कर्फ्यूचा फटका रो-रो पर्यटकांना, 12-13 प्रवासी अलिबागच्या माडंवा पोर्टवर अडकले

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Dec 2020 11:22 PM (IST)

    मुबंईच्या नाईट सचांरबंदीचा फटका रो-रो पर्यटकांना, 12-13 प्रवासी अलिबागच्या माडंवा पोर्टवर अडकले

    – रात्री १० वा. अलिबाग ते माऊचा धक्का ( मुबंई ) येणा-या शेवटच्या फेरीचा नाईट सचांरबंदी मुळे ९.३० वा. वेळ बदलल्याने काही प्रवाशी पोहचले उशिरा. – १०-१२ प्रोढ प्रवाशी तर ३ छोटी बालके असलेल्या प्रवाश्यांनी माडंवा पोर्टवर घातला गोधंळ. – मुबंई नाईट सचांरबंदी रो – रो व्यवस्थापनाने वेळेत केलेल्या बदलाची कल्पना नसल्याने प्रवाशी अलिबागहुन परतताना माडंवा पोर्टवर पोहचले उशिरा. – परंतु माडंवा सागरी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक व स्टाफने घटनास्थाळी धाव घेऊन प्रवाश्यांची समजुत काढली. – अखेर पोलीसांच्या सहकार्याने खाजगी स्पीड बोटीची व्यवस्था करुन अडकलेल्या प्रवाश्यांना सोडणार मुबंईला.

  • 27 Dec 2020 10:03 PM (IST)

    ब्रिटनमधील आलेला रिसोडमधील एकजण कोरोना बाधित आढळल्याने शहरात दहशत

    ब्रिटनमध्ये नवीन कोरोना व्हायरस आलेल्या  प्रकाराने जग हादरला आहे. त्यामुळं राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून युरोप आणि मध्य आशियातील विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवासाची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये रिसोड येथील तीन जण शहरात आले असता यामधील एक जन कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून नवीन कोरोना हा संसर्ग कसा आहे. यासाठी सदर पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवला आहे.

  • 27 Dec 2020 10:00 PM (IST)

    वाशिममध्ये ब्रिटनहून आलेल्या सहापैकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

    वाशिममध्ये ब्रिटनहून आलेल्या सहापैकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

  • 27 Dec 2020 08:42 PM (IST)

    सातारामध्ये आनेवाडी टोलनाक्यावर पुणे- मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग

    सातारामध्ये आनेवाडी टोलनाक्यावर पुणे- मुंबई कडे जाणारया वाहनांची मोठी रांग, सलग आलेल्या सुट्टया संपल्याने चाकरमान्यांचा पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास, आनेवाडी टोलनाक्यावर व्यवस्थापनाची उडाली तारांबळ, तासाभरापासुन मुंबईकडे जाणारी वाहतुक संथ गतीने

  • 27 Dec 2020 07:39 PM (IST)

    सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फडणवीसांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या फेकण्याचा इशारा

    सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या फेकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी 10 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तरी सभेच्या ठिकाणी काही गडबड होऊ नये म्हणून पोलिसांची करडी नजर. सभेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांची नजर असणार आहे.

  • 27 Dec 2020 06:54 PM (IST)

    नवी मुंबईत पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार, गरोदर महिलेचा लोकलमध्ये विनयभंग

    नवी मुंबईत पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार, गरोदर महिलेचा लोकलमध्ये विनयभंग, गरोदर महिला उलवेमध्ये राहणारी, २२ तारखेच्या घटनेनंतर पुन्हा एकदा २५ तारखेला घडला प्रकार

  • 27 Dec 2020 06:40 PM (IST)

    रेखा जरे हत्याकांडमधील फरार आरोपी बाळ बोठे यांच्या अडचणीत वाढ

    – बाळ बोठे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

    – नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल

    – 22 वर्षीय विवाहित महिलेची बोठे यांच्या विरोधात तक्रार

    – त्यामुळे बाळ बोठे यांच्या अडचणीत वाढ

  • 27 Dec 2020 06:04 PM (IST)

    औरंगाबादेत ब्रिटनहून आलेला आणखी एक जण आढळला कोरोना पॉझिटिव्ह

    औरंगाबादेत ब्रिटनहून आलेला आणखी एक जण आढळला कोरोना पॉझिटिव्ह

    – ब्रिटनहून आलेले आतापर्यंत एकूण 2 जण कोरोना बाधित

    – आरोग्य यंत्रणा हादरली, बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरूच

    – ब्रिटनहून आलेला 29 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह

    – आरटीपीसीआर चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त

    – मागील दोन दिवसांत ब्रिटनहून आलेले दोघेजण पॉझिटिव्ह निघाल्याने हादरले औरंगाबाद

    – या तरुणास जिल्हा सामान्य रुग्णालय, चिकलठाणा या ठिकाणी उपचारासाठी केले दाखल

    – बेपत्ता 13 पैकी 8 जणांची कोरोना चाचणी

    – 5 नागरिकांचा अद्यापही ठावठिकाणा लागत नसल्याने आरोग्य यंत्रणा चिंतेत

  • 27 Dec 2020 06:03 PM (IST)

    MPLच्या गव्हर्निग कौन्सिलच्या चेअरमन पदी मिलिंद नार्वेकर आणि सूरज समंत यांची बिनविरोध निवड

    MPLच्या गव्हर्निग कौन्सिलच्या चेअरमन पदी मिलिंद नार्वेकर आणि सूरज समंत यांची बिनविरोध निवड

  • 27 Dec 2020 05:40 PM (IST)

    मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर अर्धा किमी वाहतुक कोंडी, मुंबईच्या सर्व लेन हाऊसफुल

    मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर अर्धा किमी वाहतुक कोंडी, मुबंईच्या सर्व लेन हाऊसफुल, खालापुर टोल नाका ते पालीफाटा एक्सप्रेस ब्रिजपर्यंत अर्धा किमी वाहनांच्या रांगा, वाहतुक सथं गतीने सुरू

  • 27 Dec 2020 05:36 PM (IST)

    MCA वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरूवात

    MCA वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरूवात, व्यासपीठावर शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती, अध्यक्ष विजय पाटील व्यासपीठावर

  • 27 Dec 2020 04:44 PM (IST)

    नाताळ, विकेडंनतंर परतीच्या मार्गावरील मुबंईकरांमुळे रस्ते हाऊस फुल

    – मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरुन मुबंईकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहन गर्दीमुळे एक्सप्रेस वे हाऊसफुल – मुबंई गोवा महामार्गावर माणगाव जवळ मुबंई कडे जाणा-या वाहनाच्या ६ किमी पर्यंत रागां – मुबंईमध्ये नाईट सचांरबंदी असल्याने मुबंई, नवी मुबंई, ठाणे परिसरातील नागरिक मोठ्या सख्येने कोकण, पुणा इथे पर्यटनाला गेले होते.

  • 27 Dec 2020 04:41 PM (IST)

    थोड्याच वेळात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला होणार सुरुवात

    मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA) ची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज सायंकाळी 5 वाजता वानखेडे स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली आहे. थोड्याच वेळात ही सभा सुरू होईल. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा सभा आयोजनात सोशल डिस्टनसिंग साठी वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंडवर ही सभा होतेय. MCA चे पदाधिकारी आणि सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्यासह अनेक मोठी मंडळी या सभेला उपस्थित राहतील. मुंबई क्रिकेटच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय अपेक्षित आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची मुंबई प्रीमियर लीग (MPL) च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमन पदी घोषणा होणं अपेक्षित मानले जात आहे. माजी मुख्यमंत्री-शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यानंतर मोठ्या कालावधीनंतर मिलिंद नार्वेकर यांचा MCA च्या कार्यक्षेत्रात थेट प्रवेश होईल.

  • 27 Dec 2020 03:42 PM (IST)

    एटीएसनी रांचीवरून अब्दुल माजिद नावाच्या व्यक्तिला केली अटक,

    एटीएसनी रांचीवरून अब्दुल माजिद नावाच्या व्यक्तिला केली अटक, अटक आरोपी हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळच्या असल्याची माहिती, गुजरात एटीएसच्या कार्रवाईमध्ये अटक झाला अब्दुल माजिद, एटीएस सूट्रांची माहिती

  • 27 Dec 2020 02:42 PM (IST)

    आशिष शेलार विदर्भाच्या दौऱ्यावर, विधानपरिषदेतील पराभवाची कारणं शोधणार

    नागपूर : भाजप नेते ऍड. आशिष शेलार तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून ते काल संध्याकाळी नागपुरात दाखल झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा ते या दौऱ्यात अभ्यास करणार आहेत. त्यांनी सकाळपासून 80 कर्यकर्त्यांशी थेट संवाद साधला आहे. ते उद्या अमरावती जिल्ह्याचा दौरा करतील. विधानपरिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे सत्येशोधन करण्यासाठी केंद्रीय पक्ष श्रेष्ठींनी वेगवेगळ्या नेत्यांची नेमणूक केली आहे. याअंतर्गत शेलार तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत.

  • 27 Dec 2020 02:33 PM (IST)

    शॉर्ट सर्किटमुळे 10 एकरावरीलवरील ऊस जळाला, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

    बीड : शॉर्ट सर्किटमुळे 10 एकरावरीलवरील ऊस जळाल्याची घटना, माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथे घडली आहे. जिल्ह्यातील एका आठवड्यातील ही दुसरी भीषण घटना आहे. या आगीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 27 Dec 2020 02:28 PM (IST)

    मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर अपघात, 7 जण गंभीर जखमी

    पुणे : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिजवर प्रवासी बस उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जण गंभीर जखमी तर 6 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. किवळे गावच्या हद्दीत हा अपघात झाला.

  • 27 Dec 2020 02:25 PM (IST)

    किनवटजवळ पुलावरून ट्रक कोसळल्यामुळे भीषण अपघात, 3 गंभीर जखमी

    नांदेड : पर्यायी पुलावरून ट्रक खाली कोसळल्यामुळे किनवटजवळ भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रकमधील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, काल मालेगावजवळ रस्त्यावरील खड्ड्यात पडल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमुवळे रस्ते तयार करताना ठेकेरदाराने हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जातोय.

  • 27 Dec 2020 02:19 PM (IST)

    रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, भक्तीनिवास, हॉटेल, धर्मशाळा हाऊसफुल

    नांदेड : सलग सुट्ट्यांमुळे रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. गर्दी वाढली असली तरी रेणुका मता गडावर सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. नियमांच्या अधीन राहूनच मातेच्या दर्शनाची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली आहे. दरम्यान दर्शनासाठी भक्तांची वाढ झाल्यामुळे माहुरचे सर्व भक्तीनिवास, हॉटेल, धर्मशाळा हाऊसफुल झाले आहेत.

  • 27 Dec 2020 01:49 PM (IST)

    शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसवर भाष्य करु नये : अशोक चव्हाण

    शिवसेना हा यूपीएत सहभागी नाही. त्यामुळे युपीएच्या नेतृत्वाबदल शिवसेनेने सल्ला देऊ नये, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले आहेत. तसेच, काँग्रेसने शिवसेनेला फक्त किमान समान कार्यक्रमावरच पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने काँग्रेस पक्षाबद्दल भाष्य करुन नये, अशा शब्दात चव्हाण यांनी शिवसेनेची कानउघडणी केली आहे.

  • 27 Dec 2020 11:59 AM (IST)

    गर्लफ्रेंडची हौस भागवण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या मजनूला बेड्या

    सोलापूर : गर्लफ्रेंडची हौस आणि मौजमजा करण्यासाठी दुचाकीची चोरी करणाऱ्या पंढरपुरातील एका अट्टल चोराला पोलिसांनी पकडले आहे. महादेव सगर असे चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून आतापर्यंत 7 दुचाकींची चोरी. गर्लफ्रेंडची हौस आणि मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे आरोपीने सांगितले आहे.

  • 27 Dec 2020 11:51 AM (IST)

    तरुणीने फसवल्यामुळे आळंदीमध्ये 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या

    पुणे : फेसबुकवर मैत्री करुन तरुणीने फसवल्यामुळे आळंदी येथील 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आकाश दादाभाऊ पोकळे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. फेसबुकवर मैत्री करून शारीरिक सुखाची आणि पैशाची केली मागणी केल्याचा आरोप तरुणीवर आहे.

  • 27 Dec 2020 11:45 AM (IST)

    ईडीची नोटीस मिळाल्यामुळे खडसे समर्थक आक्रमक, घोषणाबाजी करत ईडीचा निषेध

    जळगाव : राष्ट्रवादी नेते एकनात खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. जळगावमध्ये त्यांच्या समर्थकांनी ईडीविरोधात घोषणाबाजी केली. तसेच खडसे यांच्यामागे ईडीची चौकशी लावल्याचा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

  • 27 Dec 2020 11:39 AM (IST)

    देशाला प्लास्टिकमुक्त करायचं आहे, 2021 चा हा संकल्प करुया : मोदी

    आपण सर्वांनी सफाई अभियान चालवायला हवं. त्याचबरोबर आपण कचरा करणंही टाळायला हवं. आपल्याला प्लास्टिकमुक्त भारत करायचा आहे. 2021 चा हा आपला संकल्प आहे.

  • 27 Dec 2020 11:32 AM (IST)

    जोपर्यंत कुतूहल आणि उत्सुकता, तोपर्यंत शिकण्यासाठी वाव : मोदी

    गीता हा एक अद्भूत ग्रंथ आहे. प्रत्येकामध्ये कुतूहल असायला हवं. जोपर्यंत कुतूहल आहे, तो पर्यंत आपण शिकत राहू शकतो. प्रत्येकाने एखाद्या विषयाबद्दल उत्सुकता बाळगायला हवी.

  • 27 Dec 2020 11:27 AM (IST)

    काश्मीरच्या केशरला ल्गोबल पॉप्यूलर ब्रँड बनवायचं आहे : मोदी

    काश्मीरमध्ये सौंदर्य अप्रतिम आहे. केशरची शेती काश्मीरमध्ये केली जाते. केशरची शेती पुलवामा, बडगाम या जिल्ह्यांमध्ये केली जाते. याच वर्षातील मे महिन्यातील जीआय (GI) टॅग दिला गेला. केशरमध्ये औषधी गुणधर्म आहेत : मोदी

  • 27 Dec 2020 11:22 AM (IST)

    नरेंद्र मोदी यांची या वर्षातील शेवटची ‘मन की बात’ LIVE

    देशात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मध्ये प्रदेशात बिबट्यांची संख्येतही मोठी वाढ. महाराष्ट्र बिबट्यांच्या संख्येत तिसऱ्या स्थानावर : मोदी

  • 27 Dec 2020 11:21 AM (IST)

    देशातील युवक सकारात्मक आहेत. त्यांचे ध्येय आणि आत्मविश्वास मोठा आहे.

  • 27 Dec 2020 11:18 AM (IST)

    थंडी वाढल्यामुळे दिल्लीत प्राण्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे : मोदी

    दिल्लीमध्ये थंडी वाढली आहे. या काळात प्राण्याचे हाल होत आहेत. मात्र, असा काळात अनेक लोक या प्राण्यांच्या जेवणाची सोय करत आहेत.

  • 27 Dec 2020 11:14 AM (IST)

    गुरु तेगबदाद्दूर यांना, त्यांच्या आईला नमन : नरेंद्र मोदी

    गुरु तेगबदाद्दूर यांना, त्यांच्या आईला नमन : नरेंद्र मोदी

  • 27 Dec 2020 11:13 AM (IST)

    Narendra Modi | गरु तेगबदाद्दूर यांना, त्यांच्या आईला नमन : नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात सुरु झाली आहे. मोदी यांची या वर्षाची शेवटची नम की बात आहे. शेवटची मन की बात असल्यामुळे मोदी काय बोलणार यांकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

  • 27 Dec 2020 11:10 AM (IST)

    भारतात तयार झालेल्या उत्पदनांचा उपयोग करा : मोदी

    दिवसभरातील कामाची यादी करा. सर्व कामांवर विश्लेषण करा. भारतात देशात तयार झालेल्या उत्पदनांचा उपयोग करा : मोदी

  • 27 Dec 2020 10:12 AM (IST)

    कोल्हापुरात चेन स्नॅचिंगच्या घटनांत वाढ, नागरिकांमध्ये भीती

    कोल्हापूर : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चेन स्नॅचिंगच्या घटनांतही वाढ झाली आहे. शनिवारी दिवसभरात दोन ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. रमणमळा आणि राजेंद्रनगर परिसरात हे प्रकार घडले आहेत. शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यात घटनांची नोंद करण्यात आली आहे.

  • 27 Dec 2020 09:41 AM (IST)

    रावेर येथील पंचायत समितीचे सभापती, उपसभापती राजीनामे देणार

    जळगाव : रावेर येथील पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती राजीनामे देणार आहेत. त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने भाजप त्यांचे राजीनामे घेणार आहे. दरम्यान, सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामे दिल्यानंतर या पदांसाठी कुणाची नावं समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 27 Dec 2020 09:37 AM (IST)

    दत्तजन्म सोहळा साध्या पद्धतीने साजरा होणार, देवगडाचे सर्व रस्ते बंद करण्यात येणार

    अहमदनगर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देवगड संस्थान येथील दत्तजन्म सोहळा साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा सोहळा काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत होणार साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो भाविक अपस्थित असतात. मात्र, कोरोनामुळे हा सोहळा या वर्षी साजरा होणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून 29 आणि 30 डिसेंबर रोजी देवगडकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले जाणार आहेत.

  • 27 Dec 2020 09:27 AM (IST)

    नाशिकमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीला शिवसेनेचा विरोध, पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

    नाशिक : नाशिकमध्ये माहनगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरणत तापलं आहे. पालिकेच्या निवडणुकीत एकसदस्यीय प्रभाग पद्धतीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. नाशिकच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेत द्विसदस्यीप प्रभाग रचनेचा असावी अशी मागणी केली आहे. एकसदस्यीय प्रभाग पद्धत शिवसेनेला महापालिकेवर भगवा फडकवण्यास अडथळा आणू शकते अशी भीती शिवसेना पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 27 Dec 2020 09:27 AM (IST)

    भाजपच्या काळातील विषय समित्या आणि अभ्यासगट बालभारतीकडून बरखास्त

    मुंबई : भाजपच्या काळातील नियुक्त केलेल्या विषय समित्या आणि अभ्यासगट बालभारतीकडून बरखास्त करण्यात आल्या आहेत. या समित्या तसेच अभ्यासगटात नव्याने नेमल्या जाणाऱ्या मंडळांमध्ये विद्यमान सरकारशी संबंधित सदस्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे. भाजप नेते विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना नवा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी या विषय समित्या आणि अभ्यासगटांची पुनर्रचना करण्यात आली होती. भाजपचे सरकार असताना नेमणुकांमध्ये भाजपशी संबंधित सदस्यांची वर्णी लावण्यात आल्याची चर्चा होती. त्यांनतर आता बालभारतीने या विषय समित्या आणि अभ्यासगट बरखास्त केले आहेत.

  • 27 Dec 2020 09:26 AM (IST)

    पगार मिळत नसल्याने मोनो रेलच्या कर्मचाऱ्यांचे हाल, उधारीवर घर चालवण्याची वेळ

    मुंबई : पगार मिळत नसल्यामुळे मोनो रेलच्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे त्यांना उधारीवर आपला प्रपंच चालवण्याची वेळ आली आहे. तसेच, मागील तीन महिन्यांपासून साप्ताहिक सुटी घेतल्याने पगारात कपात करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

  • 27 Dec 2020 09:26 AM (IST)

    कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनंतर दादरमध्येही शून्य कोरोना रुग्ण

    मुंबई : आशियातील सर्वांत मोठ्या धारावी झोपडपट्टीत 25 डिसेंबरला एकही रुग्ण सापडला नसताना आज जी-उत्तर विभागातील दादरमध्येसुद्धा एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. 30 एप्रिलनंतर पहिल्यांदाच दादरमध्ये रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसह दादरमध्येही झपाट्याने रुग्णसंख्या वाढत गेल्याने पालिकेसमोर आव्हान वाढले होते. मात्र सध्या धारावीसोबतच दादरमध्ये कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे दिसत आहे.

  • 27 Dec 2020 09:21 AM (IST)

    31 डिसेंबरला CBSE बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर होणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती

    नवी दिल्ली : CBSE बोर्डाच्या परीक्षा कधी सुर होणार याबद्दल ताणलेली उत्सुकता लवकरच संपणार आहे. येत्या 31 डिसेंबरला CBSE बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर केली जाणार आहे. तशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे.

  • 27 Dec 2020 09:16 AM (IST)

    ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली तर गावाला 21 लाख, प्रत्येक वार्डाला 5 लाख रुपये : चिमणराव पाटील

    जळगाव : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. शिवसेनेने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे सुरु केले आहे. एरंडोल येथे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनीदेखील एरंडोल येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली तर गावाला 21 लाख आणि प्रत्येक वार्डला 5 लाख रुपये देण्याचेही चिमणराव पाटील यांनी आश्वासन दिले आहे.

  • 27 Dec 2020 08:25 AM (IST)

    मुंबईत कोरोना संसर्गात वाढ, सरासरी दर 0.21 टक्क्यांनी वाढला

    मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच कोरोना संसर्गाचा सरासरी दरही वाढला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळण्याचा सरासरी दर 0.21 टक्क्यांनी वाढला आहे. तर शुक्रवारी मुंबईत 536 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत 93 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 11068 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 363 दिवसांवर पोहोचला आहे. महापालिकेच्या अहवालानुसार मुंबईत सध्या 8 हजार 279 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 2 लाख 70 हजार 135 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेलेले आहेत.

  • 27 Dec 2020 07:58 AM (IST)

    नागपुरात कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या वस्त्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

    नागपूर : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या वस्त्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. शहरातील गांधी बाग, सतरंजी पुरा, मोमीनपुरा हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र या भागांत आता कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत आहे. नागपुरात गेल्या 24 तासांत 322 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 27 Dec 2020 07:54 AM (IST)

    अब्दुल सत्तारांची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उडी, औरंगाबाद जिल्ह्यात संपर्क दौरा सुरु

    औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उडी घेतली आहे. त्यांनी स्थानिक पातळीवर बैठका घेणं सुरु केलं आहे. सत्तार गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. औरंगाबाद तालुक्यातील 9 जिल्ह्यांमध्ये त्यांनी संपर्क दौरा सुरु केला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रंग चढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Published On - Dec 27,2020 11:22 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.