Devendra Fadnavis : तर बार्शीच्या त्या पीआय विरोधात मी स्वत: हजारोचा मोर्चा काढेन, फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर तरी कारवाई होणार?

अवैध धंद्याविरोधात लोकप्रतिनिधी पुराव्यानिशी मुद्दे मांडत आहेत म्हणून  त्यांना टार्गेट करण्यात येत असेल तर ही चुकीची गोष्ट असल्याचे सांगत पोलीस निरीक्षकाबाबत काही गोष्टी त्यांनी उपस्थित केल्या. तर अशा गोष्टी होत असतील तर तर बार्शीच्या त्या पीआय विरोधात मी स्वत: हजारोचा मोर्चा काढेण असे म्हणत त्यांनी जोरदार आणि गंभीर आरोप केले.

Devendra Fadnavis : तर बार्शीच्या त्या पीआय विरोधात मी स्वत: हजारोचा मोर्चा काढेन, फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर तरी कारवाई होणार?
Devendra Fadnavis barshi PIImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 6:39 PM

मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत राज्यातील समस्यांवर मुद्दे उपस्थित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या छोट्या भाषणासह महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र म्हणत मविआवर जोरदार हल्लाबोल केला. बार्शीतील पोलीस निरीक्षक शेळके आणि आमदार राजेंद्र राऊत यांचा वाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशानात (Maharashtra Budget Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदारपणे उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी अवैध व्यवसायाविरोधात मुद्दा मांडत असतील आणि तोही पुराव्यानिशी देत असतील तर त्याचा तपास होणं गरजेचे आहे. मात्र अवैध धंद्याविरोधात लोकप्रतिनिधी पुराव्यानिशी मुद्दे मांडत आहेत म्हणून  त्यांना टार्गेट करण्यात येत असेल तर ही चुकीची गोष्ट असल्याचे सांगत पोलीस निरीक्षकाबाबत काही गोष्टी त्यांनी उपस्थित केल्या. तर अशा गोष्टी होत असतील तर तर बार्शीच्या त्या पीआय विरोधात मी स्वत: हजारोचा मोर्चा काढेण असे म्हणत त्यांनी जोरदार आणि गंभीर आरोप केले.

यामध्ये आमदार राऊत यांच्या मुलाला फसवण्याचाही प्रकार घडण्याची शक्यता त्यांनी सांगितली. तर या पोलीस निरीक्षकांबाबत मी स्वतः तक्रार करुनही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणववीस यांनी गृहमंत्री यांच्यावरही टीका केली. या प्रकरणी बार्शीच्या पोलीस निरीक्षकाबद्दल गृहमंत्र्यांनी एकादा आपल्या छातीवर हात ठेऊन खरे काय ते सांगावे असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

लोकप्रतिनिधींवर पोलिसांकडून दंडूकेशाही

या सगळ्या चुकीच्या घटना घडत असून लोकप्रतिनिधींवर जर पोलिसांकडून दंडूकेशाही चालवली जात असेल तर ती चुकीची आहे, आणि त्यासाठी मी स्वतः तिथे जाऊन हजारोंच्या संख्येने मोर्चा काढेन असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मोठे आणि भयानक घोटाळे

तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मला आश्चर्य वाटतं की कोविडच्या काळातही इतके मोठे आणि भयानक घोटाळे झाले आहेत की, त्याविषयी न बोललेच बरं. तर सप्टेंबर 2020 मधील परिस्थिती अशी होती की, वजन पडल्याशिवाय कोणतीही फाईलीच हालत नव्हती. त्यामुळे या सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

फाईल पुढं का सरकत नाही

राज्यातील गरिबांसाठी औषध खरेदीसाठी आयुक्तांना पत्र पाठवण्यात आली तीही 15 महिन्यात 18 स्मरणपत्र पाठवली गेली. तर वर्षभरानंतर फाईल गहाळ झाल्याचं सांगण्यात आले, त्यानंतर मग पुन्हा वेगळं पत्र देण्याती आली तरीही फाईल ही काही पुढं सरकली नाही त्यामुळे ही फाईल नेमकी कशाटची वाट पाहत होती हे वेगळं सांगायला नको असे सांगत त्यांनी महाविकास आघाडी कशी घोटाळे करते यावर जोरदार टीका त्यांनी केला.

मुंबईत येणाऱ्या गरीबांना आपण काय देतो?

यावेळी महापालिकेला सर्वात जास्त इंटरेस्ट कशात तर पेन्ग्विनमध्ये आहे. पेग्विनचा प्रश्न उपस्थि करुन मुंबईतील इतर विकासाच्या गोष्टीकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबईची रंगरंगोटी करणे चांगली गोष्ट आहे, पण पण मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या गरीब माणसाला उपचारासाठी आपण काही देत नसू तर त्याचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

‘कुठल्याही सहकारी साखर कारखान्याला हमी देणार नाही’ : Ajit Pawar

Devendra Fadnavis : क्लास बंद, ग्लास सुरु, फडणवीसांनी महाविकास आघाडीचा तीन नावात निकाल लावला, ठाकरे-पवारांच्या जिव्हारी?

Video: ‘तेच मूर्ख, तेच शहाणे’ आघाडी सरकारच्या कारभाराचे फडणवीसांकडून चपखल शब्दात वाभाडे !

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.