CM Thackeray : ‘ऑक्सिजनच्या तुटवड्याची माहिती आली की एसीत घाम येतो’, मुख्यमंत्र्यांच्या संवादातील 10 महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यातील 10 महत्त्वाचे मुद्दे.

CM Thackeray : 'ऑक्सिजनच्या तुटवड्याची माहिती आली की एसीत घाम येतो', मुख्यमंत्र्यांच्या संवादातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 9:27 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी काळात अधिक कडक निर्बंधांची गरज असल्याचं दिसत असलं तरी निर्बंध लादणार नसल्याचं नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणांच्या उभारणीचीही माहिती दिली. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या सदिच्छा देतानाच त्यांनी लवकरच हा सूवर्ण दिवस सोन्याच्या झळाळीने साजरा करता येईल, अशी आशा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे (Maharashtra CM Uddhav Thackeray video conferencing 10 important points Corona Lockdown).

मुख्यमंत्र्यांच्या संवादातील 10 महत्त्वाचे मुद्दे

1. उच्च न्यायालयाने आत्ता असलेल्या निर्बंधांपेक्षा कडक निर्बंध लादण्याची गरज आहे का असं विचारलंय. तशी गरज वाटत असली तरी मला ही गरज वाटत नाही. हे निर्बंध लादले जाणार नाही. माझे महाष्ट्रातील नागरिक नियम पाळतील.

2. गरज नसताना रेमडेसिव्हीर दिल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. अनावश्यक रेमडेसिव्हीरचा वापर करू नये. रेमडेसिव्हीरच्या चुकीच्या वापराने दुष्परिणाम होत आहेत. महाराष्ट्राला दररोज 50 हजार इंजेक्शनची आवश्यकता आहे. केंद्रानं सर्व स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. आपल्याला सुरुवातीला केंद्रानं 43 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन पुरवलीत. आता रोज 35 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळतात.

3. ऑक्सिजनला रुग्णाजवळ नेता येत नसेल तर रुग्णाला ऑक्सिजन प्लांटजवळ नेण्यात येतंय. रुग्णालयांना ऑक्सिजन प्लँट उभारण्यास सांगण्यात आलंय. भविष्यात ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही, अशी व्यवस्था उभी केली जातेय. त्या अंतर्गत पावणे तिनशे ऑक्सिजन प्लँट सुरु होतील.

4. तिसरी लाट येणार असं तज्ज्ञ सांगतायत. तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ देणार नाही. त्यासाठी सरकारनं कंबर कसलीय. उद्योजकांना तिसऱ्या लाटेची तयारी करायला सांगितलं आहे.

5. महाराष्ट्रात जवळपास 6 कोटी नागरिक आहेत. प्रत्येकाला दोन डोस द्यायचे ठरले तर 12 कोटी डोसेस लागणार आहे. हे डोसेस राज्य सरकार एका चेकने खरेदी करेल. लस मिळत असेल तर एकाचवेळी सर्व पैसे देऊन आपण लस खरेदी करु. आता केंद्राने यात लक्ष घालावं.

6. केंद्र म्हणून सरकारने राज्यांना वेगळं अॅप द्यावं किंवा राज्यांना तशी परवानगी द्यावी. हे अॅप केंद्राच्या अॅपशी जोडलं जाईल. ही व्यवस्था होत नाही तोपर्यंत अॅपवर लसीकरणाची नोंद करताना काळजी घ्या.

7. जून जुलैपासून लस पुरेशा प्रमाणात मिळेल. तोपर्यंत लसीकरणासाठी झुंबड उडू देऊ नये. सर्वचजण निर्बंधांना उबगलेत. मात्र, लसीकरण केंद्रांवर गर्दी करुन चालणार नाही. 1 मे रोजी पहिली लस देणार आहे, शेवटची नाही. माझा शब्द आहे केंद्राने दिलेली 18-44 वयाच्या नागरिकांची सोय केली जाईल.

8. महाराष्ट्रात मार्च 2020 रोजी 2 कोरोना चाचणी प्रयोगशाळा होत्या. 29 एप्रिल 2021 रोजी 609 प्रयोगशाळा आहेत. जून 2020 रोजी कोव्हिड सेंटर्सची संख्या 2665 होती, ती आता 29 एप्रिल 2021 रोजी 5595 इतकी आहे. जून 2020 रोजी 3 लाख 36 हजार 384 रुग्णशय्या (बेड), 29 एप्रिल 2021रोजी 4 लाख 31 हजार 902 बेड उपलब्ध झालेत.

9. आपल्याकडे ३ लाख ४४ हजार लसी आल्या आहेत. त्या लोकसंख्येनुसार वितरित झाल्या आहेत. आपली क्षमता दहा लाखांची दिवसा आहे. आपण पाच लाखांचा टप्पा गाठला आहे. आपण दिवसरात्र मेहनत करुन महाराष्ट्र कोरोनामुक्त करु.

10. आगामी काळात लग्नाचे अनेक मुहुर्त आहेत. मात्र, कोरोनामुळे आपण केवळ 25 माणसांची परवानगी दिलीय. काही जण दर काही वेळेने 25 माणसं आणतात तसं करु नये. लग्न समारंभ शिस्तीने पार पाडा. तसं केलं तरच या संकटातून मोकळ होता येईल.

हेही वाचा :

CM Uddhav Thackeray LIVE : रुग्णवाढ स्थिरावलेय, ऑक्सिजन काटावर आहे : मुख्यमंत्री

गरज नसताना रेमडेसिव्हीर दिल्यास दुष्परिणाम, अनावश्यक रेमडेसिव्हीरचा वापर टाळाः मुख्यमंत्री

आता हवेतून ऑक्सिजन बनविणारी मशीन परदेशातून ऑनलाईन मागवता येणार, सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ पाहा :

Maharashtra CM Uddhav Thackeray video conferencing 10 important points Corona Lockdown

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.