Maharashtra College Reopen | 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय पुन्हा सुरु, 75 टक्के उपस्थितीची अट शिथील

Maharashtra College Reopening date announced : येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहेत, असे उदय सामंत म्हणाले. 

Maharashtra College Reopen | 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय पुन्हा सुरु, 75 टक्के उपस्थितीची अट शिथील
उदय सामंत
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 7:01 PM

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु केली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. (Maharashtra College Reopening date announced, colleges start From 15 February said Uday Samant)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. महाविद्यालये सुरु करण्यात यावी अशी मागणी विविध क्षेत्रातून होत होती. याबाबत 1 फेब्रुवारीला सर्व कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतीगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) विद्यापीठांनी तयार करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या होत्या.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 5 नोव्हेंबर, 2020 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेची उपलब्धता पाहून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी 50 टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन घेण्यात आला. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहेत, असे उदय सामंत म्हणाले.

सध्या 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू केले जातील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन देण्याची सूटही देण्यात आली आहे. शाळेत किंवा महाविद्यालयात 75 टक्के उपस्थिती अनिर्वाय असणे गरजेचे असते. मात्र यंदा कोरोनामुळे ही अट शिथील करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

निकालावर परिणाम 

महाविद्यालये सुरु करताना कोविड-१९ बाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आरोग्याची काळजी घेऊन विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्के बंधनकारक करु नये. तसेच उपस्थितीसंदर्भात ऑफलाईन/ऑनलाईन दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावे, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीनंतर यूजीसीच्या गाईडलाईन्सनुसार येत्या 15 फेब्रुवारीपासून 50 टक्के उपस्थितीमध्ये आम्ही कॉलेज सुरू करत आहोत. महाविद्यालय उशिरा सुरू होणार असल्याने त्याचे परिणाम निकालावर थोड्या प्रमाणात होतील, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

परीक्षेसाठी ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही पर्याय

युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

वसतीगृह टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करुन वसतीगृहाचे इलेक्ट्रिक आणि सेफ्टी ऑडिट करुन घेण्यात यावे, असेही विद्यापीठांना सूचित करण्यात आले आहे. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफ लाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. (Maharashtra College Reopen From 15 February said Uday Samant)

संबंधित बातम्या : 

…आणि कल्याणच्या वर्षा राऊतांना हरवलेल्या दागिन्यांची बॅग मिळाली, लोकलमध्ये बॅग विसरलात तर चिंता करु नका

Breaking : एल्गार परिषदेला यापुढे परवानगी नको, परिषदेच्या माजी संयोजकाचीच मागणी!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.