Maharashtra College Reopen: शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरला तर कॉलेज दिवाळीनंतर सुरु, उदय सामंतांची माहिती

लॉकडाऊन करण्यात आल्यापासून ऑफलाईन पद्धतीनं कॉलेज सुरु झालेली नाहीत. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कॉलेज कधी सुरु होणार यासंदर्भात माहिती दिली आहे.

Maharashtra College Reopen: शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरला तर कॉलेज दिवाळीनंतर सुरु, उदय सामंतांची माहिती
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 3:43 PM

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर गेल्यावर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊन करण्यात आल्यापासून ऑफलाईन पद्धतीनं कॉलेज सुरु झालेली नाहीत. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कॉलेज कधी सुरु होणार यासंदर्भात माहिती दिली आहे. यंदाचं शैक्षणिक वर्षा 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल. मात्र, प्रत्यक्षात कॉलेज दिवाळीनंतर सुरु होतील, असं सामंत म्हणाले.

कॉलेज सुरु करण्यासाठी एसओपी बनवणार

अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली आहे. कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले टाकत आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले. टास्क फोर्ससोबत चर्चा करून एसओपी बनवली जाईल व मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले.

दिवाळीनंतर फिजिकल कॉलेज सुरु

1 नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष होईल. परंतु तेव्हाच दिवाळी असल्यानं कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल.तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार करतोय, असं उदय सामंत म्हणाले.

उपस्थितीची सक्ती नसेल

महाविद्यालय सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे. उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असं उदय सामंत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच महाविद्यालय सुरु

उदय सामंत यांनी कॉलेज सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं म्हटलं आहे. कोरोना कमी झालेला आहे, तिथं कॉलेज सुरू करायला काहीच अर्थ नाही. पण याकरीता मुख्यमंत्र्यांची परवानगी लागेल, असं सामंत म्हणाले.

प्राध्यापक व प्राचार्य भरतीला तत्वत: मान्यता

राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्य भरतीला तत्वत: मान्यता मिळालीय. सोमवारी किंवा मंगळवारी प्राध्यापक भरतीची फाईल अर्थ विभागाकडे जाईल. राज्यात 3074 प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत. सीएचबी तत्वावर प्राध्यापकांनाही चांगले मानधन मिळेल याचाही विचार करतोय.

पावसामुळं सीईटी परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 9 आणि 10 ऑक्टोबरला

गुलाब चक्रीवादळामुळं मराठवाड्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली. मराठवाड्यातील शेतीचं नुकसान तर झालंच होतं. तर, औरंगाबाद आणि नांदेडमधील  विद्यार्थी देखील पूरस्थितीमुळं परीक्षेला मुकले होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सकाळी सीईटी परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत पुन्हा परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता उदय सामंत यांनी परीक्षेच्या तारखा जाहीर करुन शब्द पाळला आहे. 9 आणि 10 तारखेला सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

महाराष्ट्रात विदर्भ , मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस वाढत आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने हजारो विद्यार्थ्यांची सीइटी होऊ शकली नाही कोरोना, पूर परिस्थिती , घरात वाईट घटना घडली असेल तर परत परीक्षा देत येईल. तांत्रिक अडचणी असतील तरी परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. विद्यार्थ्यांना डेंग्यू मलेरिया झाला असल्याने परीक्षा देता येणार नसेल तर त्याची परीक्षा परत देता येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे उद्या नवी जाहीर सूचना काढली जाईल. हॉल तिकीट , सेंटर पहिल्या परीक्षेचे वापरता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंच्या निर्देशानुसार 9 आणि 10 तारखेला सीईटी घेतली जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

इतर बातम्या:

MHT CET Exam Schedule : राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

MHT CET Exam Date : एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, उदय सामंतांची घोषणा

Maharashtra College Reopen Uday Samant said colleges will start after Diwali education year start from 1 November

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.