राज्यात एप्रिल महिन्यात कोरोनामृतांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली, सर्वाधिक मृत्यूदर कोणत्या जिल्ह्यात?

नव्याने निदान बाधित होणाऱ्यांची संख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 2 लाख 80 हजार इतकी झाली आहे. (Maharashtra Corona death toll rises to 25 percent)

राज्यात एप्रिल महिन्यात कोरोनामृतांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली, सर्वाधिक मृत्यूदर कोणत्या जिल्ह्यात?
Death
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 9:19 AM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे कोरोनाबळींच्या संख्येत कमालीचा उद्रेक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात सिंधुदुर्ग, परभणी, नंदुरबार, अहमदनगर येथे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. (Maharashtra Corona death toll rises to 25 percent in April)

महाराष्ट्रात गेल्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या एकट्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत 25 टक्के वाढ पाहायला मिळत आहे. तर नव्याने निदान बाधित होणाऱ्यांची संख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 2 लाख 80 हजार इतकी झाली आहे.

मृतांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ

त्यामुळे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल महिन्यात उच्चांक गाठला असून बाधितांची संख्या 57 टक्क्यांना वाढली आहे. एकीकडे बाधितांच्या प्रमाणात मृत्यूदरात घट झाली असली तरी मृतांच्या संख्येत मात्र या महिन्यात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यात राज्यात सध्या सर्वाधिक मृत्यूदर सोलापूरचा असून जवळपास 4 टक्के इतका आहे. तर सिंधुदुर्ग, परभणी, नंदुरबार, अहमदनगर येथे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल भिवंडी नगरपालिका(3.77 टक्के), सांगली(2.86 टक्के), कोल्हापूर(2.83 टक्के ), सिंधुदुर्ग (2.62 टक्के), मालेगाव(2.28 टक्के), उस्मानाबाद (2.30 टक्के), रत्नागिरी(2.15 टक्के), नांदेड (2.27 टक्के), सातारा(2.19 टक्के) आणि मुंबई(2.02 टक्के) यांचा समावेश आहे.

राज्यात दिवसभरात 669 रुग्णांचा मृत्यू

राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या सध्या 55 ते 70 हजारांच्या दरम्यान स्थिर आहे. कोरोना हा गुणाकार करतो. मात्र, हा गुणाकार थोपवण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आलं आहे. याशिवाय राज्यात कडकडीत लॉकडाऊन असल्याने परिस्थितीत थोडीफार नियंत्रणात येताना दिसत आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा आजही नियंत्रणात आलेला नाही. रोज शेकडो रुग्णांचा मृत्यू होतोय. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 669 रुग्णांचा मृ्त्यू झालाय. रुग्णांचा मृत्यू आकडा कमी करणं हे सरकार आणि प्रशासनापुढील मोठं आव्हान आहे.

राज्यातील कोरोना अपडेट

राज्यात काल दिवसभरात तब्बल 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Maharashtra Corona Update) आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दररोज वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दररोज कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाख 22 हजार 401 वर पोहोचला आहे. यापैकी 39 लाख 81 जार 685 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज दिवसभरात 51 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं जरी असलं तरी बाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे. (Maharashtra Corona death toll rises to 25 percent in April)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona | राज्यात दिवसभरात 669 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

कोरोना रुग्णांना मोठा दिलासा; ऑक्सिजन बेडसाठी केंद्राने घेतला ‘हा’ निर्णय

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.