Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 6 हजार 112 नवे रुग्ण, 44 बाधितांचा मृत्यू
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 87 हजार 632 इतका झाला आहे. (Maharashtra Corona Update)
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ लागला आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6 हजार 112 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 87 हजार 632 इतका झाला आहे. (Maharashtra Corona Patient Update 19 February)
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आज (19 फेब्रुवारी) राज्यात 6 हजार 112 नव्या रुग्णांचे नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 44 हजार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्यार राज्यातील मृत्यूदर 2.48 टक्के इतका आहे. तर दुसरीकडे आज 2 हजार 159 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 89 हजार 963 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के इतके आहे.
Maharashtra reported 6,112 new COVID-19 cases, 2,159 discharges, and 44 deaths in the last 24 hours, as per State Health Department
Total cases: 20,87,632 Total recoveries: 19,89,963 Active cases: 44,765 Death toll: 51,713 pic.twitter.com/ICbzgMRrN8
— ANI (@ANI) February 19, 2021
दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 87 हजार 632 इतका झाला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात एकूण 44 हजार 765 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात 2 लाख 24 हजार 087 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1 हजार 588 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.(Maharashtra Corona Patient Update 19 February)
?मुंबई-पुण्याला कोरोनाचा विळखा?
मुंबईत आज दिवसभरात 823 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 3 लाख 17 हजार 310 इतका झाला आहे. आज दिवसभरात मुंबईत 5 जणाचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ पुणे शहरात दिवसभरात 211 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे मनपात दिवसभरात 535 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 259 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
कोणत्या महामंडळात किती कोरोनाबाधित?
ठाणे मंडळात दिवसभरात 1 हजार 453 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर, पालघर, वसई-विरार, रायगड, पनवेल या शहर आणि महापालिकेचा समावेश आहे.
नाशिक मंडळात आज दिवसभरात 689 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात नाशिक, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, अहमदनगर मनपा, धुळे, धुळे मनपा, जळगाव, जळगाव मनपा, नंदूरबार या शहर आणि महापालिकेचा समावेश आहे.
पुणे मंडळात एकूण 1165 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात पुणे, पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, सोलापूर, सोलापूर मनपा, सातारा याचा समावेश आहे.
कोल्हापूर मंडळात आज दिवसभरात 71 कोरोना रुग्ण वाढले आहेत. यात कोल्हापूर, कोल्हापूर मनपा, सांगली, सांगली मनपा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या महापालिकांचा समावेश होतो.
औरंगाबाद मंडळात एकूण 243 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात औरंगाबाद, औरंगाबाद मनपा, जालना, हिंगोली, परभणी, परभणी मनपा या महापालिकांचा समावेश आहे. (Maharashtra Corona Patient Update 19 February)
लातूर मंडळात एकूण 170 कोरोनाबाधितांची रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात लातूर, लातूर मनपा, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड मनपाचा समावेश आहे. तर अकोला मंडळात आज दिवसभरात एकूण 1400 रुग्णांची नोंद झाली आहे. यात अकोला, अकोला मनपा, अमरावती, अमरावती मनपा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या शहरांचा समावेश आहे.
त्याशिवाय नागपुरात एकूण 921 रुग्णांची नोंद झाली आहे. यात नागपूर, नागपूर मनपा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर मनपा, गडचिरोली या सर्व शहरांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
(Maharashtra Corona Patient Update 19 February)
संबंधित बातम्या :
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विलगीकरण, महापौरांकडून हॉटेलची पाहणी