Maharashtra Corona Update : सांताक्रुझमध्ये आढळला कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, आरोग्यमंत्र्यांची माहिती, खबरदारीच्या केंद्राच्या सूचना
महाराष्ट्रात कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच त्याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतील सांताक्रुझमध्ये हा रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील लॅबमध्ये रुग्णाच्या नमुन्यांची पडताळणी करण्यात आली.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) कमी झाल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशावेळी चिंता करायला लावणारी एक बातमी समोर आलाय. महाराष्ट्रात कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा (Corona XE Variant) पहिला रुग्ण आढळून आलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीच त्याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतील सांताक्रुझमध्ये हा रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील लॅबमध्ये रुग्णाच्या नमुन्यांची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, XE व्हेरिएंटमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रासह पाच राज्यांना कोरोनाबाबत सतर्क राहण्याचं पत्र देण्यात आलंय. महाराष्ट्रात खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्रानं दिल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये या नमुन्यात म्युटेशन
दरम्यान, एएनआयने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या XE व्हेरिएंटची पडताळणी होईपर्यंत आम्ही यावर भाष्य करु शकणार नाही. हा प्रकार वेगळा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. XE व्हेरिएंटचा रुग्ण गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही आढळला आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज अग्रवाल यांनी सांगितलं की, आम्ही महाराष्ट्र आणि गुजरात सरकारसोबत सातत्याने संपर्क साधून आहोत. बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये या नमुन्यात म्युटेशन आढळून आले. जीनोम सिक्वेन्सिंगची गरज असल्यामुळे त्याचे नमुने कोलकाता येथे पाठवण्यात आले. त्या नमुन्यांची पडताळणी केल्यानंतर तो XE प्रकार असल्याची पुष्टी झाली.
महाराष्ट्रानंतर गुजराजमध्ये कोरोना XE व्हेरिएंटचा रुग्ण
After Maharashtra, now new XE variant of corona virus knocked in #Gujarat too #XEVariant #coronavirus https://t.co/jxr4EvGBTM #latest_news
— The National Bulletin (@TheNationalBul1) April 9, 2022
XE व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णाचा मुंबई ते बडोदा प्रवास!
या प्रकाराची लागण झालेल्या व्यक्तीने मुंबई ते गुजरातमधील वडोदरा असा प्रवास केला होता. 66 वर्षीय व्यक्ती मुंबईहून वडोदरा येथील गोत्री येथे पोहोचली होती आणि एका खाजगी हॉटेलमध्ये थांबली होती. यादरम्यान, लक्षणे दिल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली आणि कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. ही वृद्ध व्यक्ती देखील 3 लोकांच्या संपर्कात आली होती. या सर्व लोकांची चाचणी देखील करण्यात आली होती परंतु त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
इतर बातम्या :