Maharashtra Corona Update : चिंताजनक; दिवसभरात 60 हजाराच्या घरात रुग्ण, मृतांचा आकडाही 300 पार
आज दिवसभरात राज्यात तब्बल 59 हजार 907 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज दिवसभरात राज्यात तब्बल 59 हजार 907 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची स्थिती किती विदारक बनत चालली आहे, याचा अंदाज येऊ शकतो. (The number of corona patients is around 60,000, while 300 people die due to corona)
राज्यात गेल्या 24 तासांत 60 हजाराच्या घरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 30 हजार 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही आता 5 लाखाच्या वर गेलीय. राज्यात सध्या 5 लाख 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 31 लाख 73 हजार 261 झाली आहे. त्यातील 26 लाख 13 हजार 627 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 56 हजार 652 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Maharashtra reports 59,907 new COVID cases, 30,296 recoveries, and 322 deaths in the last 24 hours
Total cases: 31,73,261 Active cases: 5,01,559 Total recoveries: 26,13,627 Death toll: 56,652 pic.twitter.com/eWsr5P17CT
— ANI (@ANI) April 7, 2021
मुंबईतील कोरोना स्थिती –
मुंबईतही आज दिवसभरातील वाढलेला कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 10 हजार 428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 16 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 14 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे.
मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता 35 दिवसांवर येऊन ठेपलाय. 31 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.91 टक्के झाला आहे.
#CoronavirusUpdates ७ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/2yz9zEUog8
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 7, 2021
पुण्यातील कोरोना स्थिती –
पुण्यात आज दिवसभरात 5 हजार 651 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 4 हजार 361 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 13 जण हे पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 4 लाख 60 हजार 71 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 957 जणांची कोरोना स्थिती चिंताजनक आहे. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे कोरोना अपडेट : बुधवार ७ एप्रिल, २०२१
◆ उपचार सुरु : ४६,०७१ ◆ नवे रुग्ण : ५,६५१ (३,०५,३७२) ◆ डिस्चार्ज : ४,३६१ (२,५३,७३४) ◆ चाचण्या : २६,१२० (१६,१९,८५६) ◆ मृत्यू : ४१ (५,५६७)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/i5mN2Nz2lM
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 7, 2021
नागपुरातील कोरोना स्थिती –
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ आज झाली आहे. गेल्या 24 तासांत 5 हजार 338 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 हजार 668 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या आकडेवारीसह जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 42 हजार 933 वर पोहोचली आहे.
संबंधित बातम्या :
Pune Lockdown : ‘व्यापाऱ्यांचा संयम संपला, कधीही दुकाने उघडतील’, पुण्यातील व्यापारी संघटनांचा इशारा
कोरोना वाढतोय, नाशिकमध्ये रुग्णांसाठी बेड्सचं नियोजन कसं? मंत्री भुजबळांकडून आढावा, 640 बेड्स वाढवले
The number of corona patients is around 60,000, while 300 people die due to corona