Maharashtra Government Employees Strike Live : सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीरच, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

| Updated on: Mar 18, 2023 | 6:11 AM

Maharashtra Government Employees Strike Live Updates : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. तब्बल 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

Maharashtra Government Employees Strike Live : सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीरच, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
Maharashtra Government Employees StrikeImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यातील 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सलग चौथ्या दिवशीही संप सुरूच आहे. या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात शाळा, महाविद्यालयांपासून वैद्यकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत. रुग्णालयीन कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. एवढेच नव्हे तर पुरेसा स्टाफ नसल्याने अनेक रुग्णालयातील शास्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सलग चौथ्या दिवशीही संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Mar 2023 05:31 PM (IST)

    हिंगोली येथे दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाला सुरुवात

    जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात

    वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेसह हरबरा ,गव्हासह इतर पिकांचे नुकसान

    संत्र्याचे झाडे मोडून पडल्याने मोठे नुकसान

  • 17 Mar 2023 04:04 PM (IST)

    कर्नाटकमधील काँग्रेस नेते डिके शिवकुमार पुन्हा बरळले

    सीमा भागात संतापाची लाट

    महाराष्ट्राला एक इंच ही जमीन देणार नाही

    महाराष्ट्राने बेळगावमधील आणि 865 गावातील मराठी माणसाला ज्या सुविधा दिल्या आहेत, आरोग्याची योजना दिली आहे त्याचा कर्नाटक काँग्रेस निषेध करते

    इथल्या जमिनीचा कण आणि कण आमचा आहे आणि पाणीही आमचे आहे, त्याबाबत मी महाराष्ट्र सरकारला इशारा देतो.

  • 17 Mar 2023 03:45 PM (IST)

    शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विधिमंडळात दाखल

    मुख्यमंत्री समिती कक्षात बसून करणार चर्चा

    काल झालेल्या आश्वासनांवर आज शिष्टमंडळासमोर सरकार मांडणार

    शिष्टमंडळाच्या मान्यतेनंतर हेच इतिवृत्त मुख्यमंत्री विधानसभा पटलावर ठेवणार….

  • 17 Mar 2023 03:36 PM (IST)

    अमरावतीत सरकारची तिरडीवर अंत्ययात्रा

    अमरावतीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोर्चात काढली सरकारची तिरडीवर अंत्ययात्रा
    पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी तिरडी घेतली ताब्यात
    जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी हजारो कर्मचारी धडकले जिल्हाधीकारी कार्यालयावर
  • 17 Mar 2023 11:53 AM (IST)

    जुन्या पेन्शन विरोधात कोल्हापुरात बेरोजगार युवक युवतीचा मोर्चा

    कोल्हापूर

    जुन्या पेन्शन विरोधात कोल्हापुरात बेरोजगार युवक युवतीचा मोर्चा

    आयोजकांची माहिती नसल्याने मोर्चा फसला

    मात्र सोशल मीडियातील पोस्ट बघून काही बेरोजगार युवक दसरा चौकात जमले

    दोन दिवसात रीतसर परवानगी काढून पुन्हा मोर्चाचं बेरोजगार युवकांचा निर्धार

  • 17 Mar 2023 11:32 AM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीरच, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

    राज्य सरकारची उच्च न्यायालयात याचिका, याचिकेवरील सुनावणी 23 मार्चपर्यंत तहकूब

    संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू

    संपावर तोडगा काढण्यासाठी उपाय योजना काय केल्या? प्रतिज्ञापत्र सादर करा; कोर्टाचे आदेश

  • 17 Mar 2023 07:53 AM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांचा पुण्यात आज भव्य मोर्चा

    सरकारी कर्मचाऱ्यांचा पुण्यात आज भव्य मोर्चा

    जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी सरकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

    कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा चौथा दिवस

    जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यभर सरकारी कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून सुरू आहे संप

    त्याच अनुषंगाने पुण्यात आज कर्मचारी काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  • 17 Mar 2023 07:49 AM (IST)

    अमरावती : महिलांना आजपासून बसमध्ये सवलत

    अमरावती : महिलांना आजपासून बसमध्ये सवलत

    एसटी महामंडळाच्या सर्वच एसटी बसमध्ये महिलांना प्रवास तिकिटात 50 टक्के सवलत

    निमआराम, वातानुकुलीत, शिवशाही, शिवाई, शिवनेरी बसमध्येही 50 टक्के सवलत

    महिला सन्मान योजना नावाने चालणार ही योजना

  • 17 Mar 2023 07:47 AM (IST)

    पुणे : राज्यभरातील कर्मचारी संपाचा आज चौथा दिवस

    राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी आजही संपावर

    पुणे जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेवर संपाचा मोठा परिणाम

    जिल्ह्यातील एकूण 68 हजार कर्मचारी संपावर

    जिल्ह्यात एकूण 32 विभागातील कर्मचारी कालपासून संपावर

    जिल्ह्यातील बांधकाम विभाग, महसुल विभाग, कृषी विभागातील अनेक कामे रखडली

  • 17 Mar 2023 06:43 AM (IST)

    वाशिममध्ये 2784 संपकरी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाची नोटीस

    कर्मचाऱ्यांनी केली शासन निर्णयाची होळी

    वाशिम जिल्ह्यातील शासकीय,निमशासकीय कर्मचारी जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी 14 मार्च पासून बेमुदत संपावर आहेत

    यातील जिल्हा परिषदेचे संपात सहभागी असलेल्या गट क वर्गातील 2593 आणि गट ड वर्गातील 191 अशा 2784 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनानं कारणे दाखवा नोटीस बजावली

    जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काल शासन निर्णयाची होळी करत जुन्या पेंशनचं आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवलं आहे

  • 17 Mar 2023 06:40 AM (IST)

    पुण्यात ससूनच्या आरोग्य यंत्रणेवर संपाचा कुठलाही परिणाम नाही, ससूनचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांचा दावा

    70 टक्के चतुर्थ श्रेणी कर्मचारी काल कामावर हजर झाले होते

    परिचारिका अद्याप संपावर कायम असल्यामुळे कंत्राटी पद्धतीने 100 परिचारिका कामावर हजर झाल्या आहेत

    आज अजून काही कर्मचारी कामावर हजर होणार आहेत

    मी स्वतः काही महत्वाच्या शस्त्रक्रिया करत आहे, त्यामुळे एकही शस्त्रक्रिया लांबवण्यात आली नाहीय

  • 17 Mar 2023 06:37 AM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सलग चौथ्या दिवशी रुग्णांचे प्रचंड हाल

    गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे

    यापैकी काही कर्मचारी संघटनांनी संपातून माघार घेतली आहे

    मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी संपवार असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे

    आज या संपावर तोडगा निघण्याची चिन्हे दिसत आहेत

Published On - Mar 17,2023 6:35 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.