राज्यात 14 ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती, कोणत्या महापालिका क्षेत्रात किती प्लांट?

दररोज सुमारे 2 टन (960 एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे 200 ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो. (Maharashtra Construct Oxygen Plant at 14 places)

राज्यात 14 ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती, कोणत्या महापालिका क्षेत्रात किती प्लांट?
ऑक्सिजन
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 1:42 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे राज्यातील ऑक्सिजनच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता हवेतून ऑक्सिजन तयार करणारे 14 प्लांट उभारण्यात येणार आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पनवेल 12 महापालिका क्षेत्रात 14 ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट उभारले जाणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा पुढाकार घेतला आहे. (Maharashtra Government will Construct Oxygen Plant at 14 places)

मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित केले जाणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दररोज सुमारे 2 टन ऑक्सिजनची निर्मिती

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येतो. साधारणता एका प्लांटमधून दररोज सुमारे 2 टन (960 एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे 200 ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  (Maharashtra Government will Construct Oxygen Plant at 14 places)

कोणत्या महापालिका क्षेत्रात किती प्लांट?

मुंबई महानगर क्षेत्रातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात 3, कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी 2 तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी संस्थांची निवड करून त्यांना कार्यादेशही देण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन त्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन ऑक्सिजन निर्मिती करणारे पाच ते सहा प्लांट उभारण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.  (Maharashtra Government will Construct Oxygen Plant at 14 places)

संबंधित बातम्या : 

कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक, शक्यतो ‘या’ ठिकाणी जाणे टाळाच !

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत, आता ‘जन की बात’ करा; राहुल गांधींनी मोदींना डिवचले

मुंबईकरांनो कोरोना लसीकरण करायचं? तुमच्या जवळचे कोणते केंद्र आज सुरु, कोणते बंद? पाहा यादी

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.