Tesla महाराष्ट्रात येणार की तामिळनाडू, गुजरातला पसंती देणार? चित्र लवकरच स्पष्ट होणार

Elon Musk Tesla : टेस्ला या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीला भारतात डेरा टाकायचा आहे. टेस्ला कंपनी भारतात फॅक्टरी टाकण्यासाठी जागेची चाचपणी करत आहे. त्यासाठी टेस्लाची एक कंपनी भारतात येत आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरातपैकी कोणत्या राज्यात ही कंपनी तंबू टाकणार?

Tesla महाराष्ट्रात येणार की तामिळनाडू, गुजरातला पसंती देणार? चित्र लवकरच स्पष्ट होणार
टेस्ला भारतात टाकणार तंबू
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 6:02 PM

अमेरिकेतील मुख्य इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Tesla भारतात एंट्री करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हापासून कंपनी भारतात तंबू टाकण्याच्या विचारात आहे. कंपनी महाराष्ट्र, तामिळनाडून आणि गुजरातपैकी एका राज्यात तिची फॅक्टरी उभारण्याची तयारी करत आहे. भारतातून दक्षिण आशियात मुसंडी मारण्याची कंपनीची तयारी आहे. टेस्ला भारतातील प्रकल्पासाठी जवळपास 16,700- 25,000 कोटी रुपयांदरम्यान गुंतवणूक करणार आहे.

  1. Financial Times च्या वृत्तानुसार, टेस्ला या महिन्यात भारतात तिची एक तज्ज्ञांची टीम पाठविण्याची योजना आखत आहे. ही टीम भारतामधील महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यात प्रकल्पासाठी योग्य जमीन शोधत आहे. केंद्र सरकारने देशात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय देण्याचा प्रयोग देशात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यातंर्गत भारताने कमीत कमी 500 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणे आणि स्थानिक व्हेंडर्सकडून या कंपन्यांनी माल घ्यावा लागणार आहे. अशा कंपन्यांना इंपोर्ट ड्युटीमध्ये मोठी सवलत देण्यात येणार आहे.
  2. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकारच्या या धोरणातील बदलामुळे टेस्ला भारतात इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी गांभीर्याने विचार करत आहे. सध्या टेस्लाला होमग्राऊंडवर, अमेरिकेत तसेच चीनमध्ये आव्हान मिळत आहे. चीनची इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनी बिल्ड युवर ड्रीमने वाहन विक्रीत टेस्लाला मागे टाकले आहे. त्यामुळे टेस्ला आता भारतासह दक्षिण आशियातील बाजारपेठ काबीज करण्याच्या तयारीत आहे.

काय आहे योजना

टाईम्स ऑफ इंडियाच्या मागील एका वृत्तनुसार, टेस्ला भारतात जवळपास 5 लाख इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करण्याची योजना आखत आहे. टेस्लाची इलेक्ट्रिक कार 20 लाख रुपयांपासून भारतात विक्री होईल. जर ही योजना पूर्ण झाली तर भारतीय इलेक्ट्रिक बाजारात तीव्र स्पर्धा असेल. ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा आणि फीचर्ससह कार उपलब्ध होतील. इतर कंपन्यांनी पण यामध्ये मोठी भरारी घेतली आहे. भारतीय टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार उत्पादनात मोठी भरारी घेतली आहे. इतर बाहेरील ब्रँड पण भारतात येण्याच्या तयारीत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.