Konkan Rain Update : परशुराम घाट बंद, NDRFचं पथक चिपुळणात दाखल! पुन्हा पुराचा धोका, 4 मोठे अपडेट्स

Konkan Flood News : रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा पुराचा धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Konkan Rain Update : परशुराम घाट बंद, NDRFचं पथक चिपुळणात दाखल! पुन्हा पुराचा धोका, 4 मोठे अपडेट्स
कोकणात पूरस्थिती Image Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 8:43 AM

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri Rain Update) जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. तळकोकणासह रत्नागिरीच्या (Konkan Rain Update) बहुतांश तालुक्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे. तसंच पुढचे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात (Parshuram Ghat Land slide) दरड कोसळली आहे. त्यामुळे हा घाट 12 तासांपेक्षा अधिक काळ लोटला, तरी बंद आहे. परशुराम घाटात दरड कोसळण्याचा धोका असल्यानं वाहतुकीवर मर्यादा घालण्यात आल्या आहोत. त्याचा फटका मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसलाय. तसंच सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा चिपळुणात एनडीआरएफचं पथ तैनात करण्यात आलं आहे. एनडीआरएफची टीम अलर्ट मोड असून खबरदारी घेण्यात येतेय. जाणून घेऊयात याच संदर्भातील चार मोठे अपडेट्स…

1 जगबुडी, काजळी नदी इशारा पातळीवर

मुसळधार पावसाने कोकणातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तर जगबुडी नदीसह काजळी नदीने इशारा पातळीवर ओलांडली आहे. तसंच वशिष्ठी नदीसोबत इतर नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नदीच्या किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

2 मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा पुराचा धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. खेड नगरपरिषदेच्या भागात भोंगा वाजवून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत.

पाहा व्हिडीओ :

3 कोकणात धुव्वाधार

मंडणगडमधील विरसई बोडणीच्या नदीवर कॉजवेवर भगदाड पडलंय. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. तर सिंधुदुर्गातील कणकवली, देवगड, कुडाळ, वेंगुर्ला, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाचा प्रचंड जोर सोमवारी पाहायला मिळालाय. येत्या 48 तासांत या भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ :

चिपळूण, राजापुरातील रस्ते जलमय

4 मुंबईत शुक्रवारपर्यंत मुसळधार

मुंबई गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झालाय. तर येत्या शुक्रवारपर्यंत मुंबई आणि उपगनरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची मुंबई आणि उपनगर परिसरात हजेरी पाहायला मिळू शकते. दरम्यान, मुंबईत झालेल्या पावसानंतर आता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणी साठी नेमका किती आहे, याचीही माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसानंतरही मुंबईसाठी अवघा 13 टक्के पाणी साठा पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत आहे, असं नोंदवण्यात आलं आहे.

वाचा पावसाचे लाईव्ह अपडेट्स : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी! पावसामुळे कुठे काय स्थिती : LIVE Updates

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.