Parambir Singh Letter : मनसुख हिरेन यांची हत्याच, अनिल देशमुख यांनाही मान्य, फडणवीसांचे 2 आरोप खरे ठरले!

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra home minister Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करत, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

Parambir Singh Letter : मनसुख हिरेन यांची हत्याच, अनिल देशमुख यांनाही मान्य, फडणवीसांचे 2 आरोप खरे ठरले!
Devendra Fadnavis_Anil Deshmukh_Parambir Singh
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 8:00 PM

Parambir Singh Letter : मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू आणि मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणामुळे ठाकरे सरकारला अक्षरश: सुरुंग लागला आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra home minister Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करत, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. मात्र परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांनीही पलटवार केला. (Maharashtra Home Minister Anil Deshmukh tweet said Mansukh Hiren was murderd after Parambir Singh Letter)

मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना आणि त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना, परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं.

Anil Deshmukh tweet

Anil Deshmukh tweet

अनिल देशमुख यांनी हा परमबीर सिंग यांच्यावर पलटवार करताना जे ट्विट केलं आहे, त्यामध्ये त्यांनी मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचं मान्य केलं आहे. ट्विटमधील पहिल्या ओळीत अनिल देशमुखांनी “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी” असं लिहिलं आहे. त्यामुळे मनसुख हिरेन यांचा मृत्यू ही हत्याच होती, हे आता गृहमंत्र्यांनी मान्य केलंय का असा प्रश्न आहे.

देवेंद्र फडणवीसांचा पहिला दावा खरा ठरला

दरम्यान, स्फोटकंप्रकरणात जी गाडी होती त्या स्कॉर्पिओचे मालक असलेले मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला रेतीबंदर खाडीत सापडला होता. त्यावेळी त्यांच्या तोंडात रुमाल कोंबलेली होते. मात्र त्यांचा मृत्यू ही आत्महत्या असल्याची नोंद होती. पण सर्वात आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांचा मृत्यू म्हणजे हत्याच आहे, हा दावा ठासून केला होता. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचे विधानसभेत पुन्हा एकदा पडसाद उमटले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्जच वाचून दाखवला होता. विमला हिरेन यांच्या संशयानुसार हिरेन यांची हत्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी केली. त्यामुळे वाझेंना तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.

देवेंद्र फडणवीसांचा दुसरा दावा

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी माझ्यावर दबाव होता असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.  इतकंच नाही तर सचिन वाझे हा ठाकरे सरकारमधील वसुली अधिकारी म्हणून काम पाहात होता, असं फडणवीस म्हणाले होते. नेमकं तेच परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा दावा परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

“मी मुख्यमंत्री पदावर असताना सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात सामावून घ्यावे, यासाठी माझ्यावर शिवसेनेचा दबाव होता. मी त्यांचा आधीचा रेकॉर्ड तपासला. मी कायदेशीर सल्ला घेतला. सचिन वाझेंना हायकोर्टाने निलंबित केलं होतं. त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेणं, योग्य होणार नाही असा मला सल्ला देण्यात आला. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदावर असताना, त्यांना संधी दिली नाही” असं फडणवीस म्हणाले होते.

संबंधित बातम्या 

Special Report | धनंजय गावडेच्या भेटीनंतर हिरेन यांची हत्या, दिल्लीतून फडणवीसांचा गंभीर आरोप

वाझेंना पोलीस दलात घेण्याचा शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका; निष्पक्ष चौकशीसाठी पोलीस आयुक्तांची बदली: अनिल देशमुख

सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे हात शोधा, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत मागणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.