गृहविभागाचा भन्नाट प्रस्ताव, पोलीस शिपाई सुद्धा PSI होणार!

राज्याचा गृहविभाग येत्या अधिवेशनानंतर एक भन्नाट प्रस्ताव घेऊन येणार आहे. यानुसार पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे.

गृहविभागाचा भन्नाट प्रस्ताव, पोलीस शिपाई सुद्धा PSI होणार!
दिलीप वळसे-पाटील
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 5:09 PM

मुंबई : राज्याचा गृहविभाग येत्या अधिवेशनानंतर एक भन्नाट प्रस्ताव घेऊन येणार आहे. यानुसार पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra home minister Dilip Walse Patil) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गृहमंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरुन याबाबतचं ट्विट करण्यात आलं आहे.  (Maharashtra home minister Dilip Walse Patil proposal for those serving in the police force to reach the post of Sub-Inspector when they retire)

त्यानुसार “पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली”

नेमका प्रस्ताव काय असणार?  

गृहविभागाच्या माहितीनुसार एखादा तरुण पोलीस शिपाई म्हणून भरती झाला, तर निवृत्त होईपर्यंत त्याला एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचता यावं. अर्थात आतापर्यंत संबंधित पदाची संख्या, आरक्षण, पात्रता असे निकष प्रमोशनसाठी लागू होतात. मात्र आता हे निकष तर असतीलच, पण पोलीस शिपायाला  निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावं, यासाठी महाराष्ट्र गृहविभाग प्रस्ताव तयार करत आहे.

राज्याचं पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होणार आहे. कोरोना संकटामुळे केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आहे. यावरुन राजकारण रंगलं आहे. मात्र गृहविभागा अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती खुद्ध गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

या प्रस्तावानुसार जो कोणी पोलिसात भरती होईल, तो निवृत्तीवेळी PSI झाला असेल हे निश्चित. हा प्रस्ताव जर निर्णयात बदलला आणि त्याची अंमलबजावणी झाली तर तो पोलीस दलासाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असेल.

संबंधित बातम्या  

Dilip Walse Patil Profile : पवारांचे स्वीय सहाय्यक ते गृहमंत्री, वाचा वळसे पाटलांचा राजकीय आलेख

जरंडेश्वर प्रकरण A टू Z, अजित पवार ED च्या रडारवर का आहेत? सोपं कारण

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.