Graduation admission: बारावीचा निकाल जाहीर झाला आता पदवी प्रक्रियाही सुरू

9 जून ते 20 जूनपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे. 10 जून ते 20 जून पर्यंत प्रवेशपूर्व नोंदणी अर्जासह प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे.

Graduation admission: बारावीचा निकाल जाहीर झाला आता पदवी प्रक्रियाही सुरू
11th Online Admission
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 11:44 PM

मुंबई: राज्यात आज बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता खरी गडबड सुरू होणार आहे ती पदवी प्रवेशासाठी. मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai university admission after HSC) पदवी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. पदवी प्रवेश प्रक्रिया (Degree Admission Process) आता 9 पासून म्हणजे उद्यापासूनच पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू (Admission Start) होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आता पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी गडबड सुरू होणार आहे. पदवी प्रवेश प्रक्रियाबाबत आता मुंबई विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार 9 जून ते 20 जूनपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहेत.

9 जून ते 20 जूनपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे. 10 जून ते 20 जून पर्यंत प्रवेशपूर्व नोंदणी अर्जासह प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे.

नेहमीप्रमाणे कोकण विभाग अव्वल

या वर्षी बारावीचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. यावर्षीच्या निकालात नेहमीप्रमाणे कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल यंदा प्रचंड कमी झाला आहे. गेल्या वर्षी मुंबई विभागाचा बारावीचा निकाल हा 99.79 टक्के इतका होता. मात्र यंदा मुंबई विभागाचा निकाल हा 90.91 टक्के इतका लागला आहे. त्यामुळे सुमारे दहा टक्क्यांची घट दिसून येत आहे.

 निकाल गेल्या वर्षीपेक्षा तब्बल दहा टक्य्यांनी कमी

मुंबई विभागाचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा तब्बल दहा टक्य्यांनी कमी लागला आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात आणि विभागात विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. अगदी कॉलेजपासून सर्व शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. तरीही मुंबई विभागाचा निकाल कमी होणं ही धक्कादायक बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.