मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग, कोव्हिड सेंटर्ससाठी BMC पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार

या सगळ्या कामांवर देरखेख ठेवण्यासाठी मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. | Lockdown Mumbai Covid

मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग, कोव्हिड सेंटर्ससाठी BMC पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 9:26 AM

मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्यामुळे आता ठाकरे सरकारने लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत युद्धपातळीवर तयारी सुरु आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खास रणनीती आखली आहे. साधारण गुढीपाडव्याच्यानंतर लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईत हा अ‍ॅक्शन प्लॅन अंमलात आणला जाणार आहे. (BMC preparing for Lockdown in Mumbai due to Coronavirus)

त्यासाठी मुंबई महानगरपालिका शहरातील पंचतारिकांत हॉटेल्स ताब्यात घेणार आहे. या हॉटेल्सचे रुपांतर कोव्हिड सेंटरमध्ये करण्यात येईल. याठिकाणी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी केला जाईल. तसेच या सगळ्या कामांवर देरखेख ठेवण्यासाठी मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

काय आहे मुंबई महानरपालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन

1 ) मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये वॉर रूमसाठी आणि जम्बो फिल्ड रुग्णालयांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नोडल आधिकाऱ्यांची नेमणूक करणार. हे नोडल अधिकारी दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत काम पाहतील.

2) वॉर रूमचे नोडल अधिकारी आणि जम्बो कोविड सेंटरचे अधिकारी एकामेकांच्या सतत संपर्कात असणार.

3 ) सर्व कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब्सना रिपोर्ट देण्यासाठी मिळणार 24 तासाचा अवधी. सर्वांत आधी लक्षण असलेल्या कोरोना रूग्णांचा द्यावा लागणार रिपोर्ट.

4 ) काही पंचताराकित हॉटेल्सचं कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर करण्यात येणार. खासगी डॉक्टरांकडे ही केंद्र चालवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात येणार.

5) विशेषत: रात्री 11 ते सकाळी 7 दरम्यान सर्व खाटांचे वाटप प्रामुख्याने फक्त जंबो फिल्ड हॉस्पिटलमध्ये आणि वॉर्ड वॉर रूम्स आणि अनुक्रमे नोडल अधिकाऱ्यांकडून रात्री संपूर्ण फास्ट ट्रॅक बेड वाटप केले जातील.

6) कोरोना रुग्णांसाठी बेडस कमी पडत असल्याने मुंबईच्या 24 वॉर्डसमध्ये काही हॉटेल्स ताब्यात घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून रुग्णालये आणि कोव्हिड सेंटरमधील बेडस संपल्यास या हॉटेल्सचा वापर करता येईल.

7) मुंबईत आणखी 325 आयसीयू बेडस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच नोडल अधिकारी खासगी रुग्णालयांमध्ये काही पेशंटस विनाकारण आयसीयू किंवा ऑक्सिजन बेडस अडवून ठेवत आहेत का, याचाही आढावा घेतील. जेणेकरून गंभीर अवस्थेतील रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येणार नाहीत.

संबंधित बातम्या : 

मुंबईकरांसाठी गरज असेल तिथे व्यवस्था, वरळी, कांजूरसह अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरसह, ICU बेडची सोय

Coronavirus: महाराष्ट्रात टंचाई असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं भाजप कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा आरोप

Maharashtra Lockdown: मुंबईतील दुकानं बंद ठेवायचेत, तर आर्थिक पॅकेज द्या; अन्यथा लॉकडाऊनला जुमानणार नाही: विरेन शाह

(BMC preparing for Lockdown in Mumbai due to Coronavirus)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.