…तर लॉकडाऊन करावाच लागेल; राजेश टोपेंच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना

मुंबईतील लोकल ट्रेनसाठी लोकांना आणखी सूट होईल, अशी आणखी वेगळी कोणती वेळ असावी, असे मला वाटत नाही. | Rajesh Tope lockdown

...तर लॉकडाऊन करावाच लागेल; राजेश टोपेंच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 7:26 AM

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या पुन्हा वाढायला लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाचा खुलासा केला. लॉकडाऊन हा आमच्यासाठी अंतिम पर्याय असेल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.  (Health Minister Rajesh Tope on lockdown in Maharashtra)

कोरोनाच्या रुग्णांची वाढणारी संख्या रोखण्यासाठी आम्ही दोन गोष्टी ठरवल्या आहेत. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिक कारवाईचे पालन करत नसतील तर कारवाई करण्याची मोकळीक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय, पण सध्या ‘वेट अँड वॉच’

मुंबईतील लोकल ट्रेनसाठी लोकांना आणखी सूट होईल, अशी आणखी वेगळी कोणती वेळ असावी, असे मला वाटत नाही. तरीही मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. पण मुख्यमंत्र्यांचं सध्याचं धोरण चांगलं आहे. सध्या केवळ ‘वेट अँण्ड वॉच’ची गरज आहे, असे टोपे यांनी म्हटले.

महाराष्ट्रावर पुन्हा लॉकडाऊनचं संकट?

महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. राज्यात रविवारी आणि सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये भलतीच वाढ झाली.रविवारी जवळपास साडे तीन हजार कोरोना रुग्ण आणि सोमवारी 3 हजार 365 नवे रुग्ण मिळाले. पाठीमागच्या दोन आठवड्यांत जवळपास 21 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग जडला आहे. यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप व्हायला सुरुवात झाली आहे, याचा अंदाज येतो. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे.

महाराष्ट्रात कुठे कुठे लॉकडाउनची शक्यता ?

संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागेल, याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु सीमित लॉकडाऊन केला जाऊ शकतो. ठराविक भागांमध्ये लॉकडाऊन करायचं झाल्यास ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा शहरांमध्ये कोरोनाच्या अधिक केसेस आहेत तिथे लॉकडाऊन होऊ शकतं. जसं की पुणे, नाशिक, अमरावती, वर्धा, मुंबई…. असंही होऊ शकतं की संपूर्ण जिल्ह्यात किंवा शहरात लॉकडाऊन लावण्याऐवजी फक्त जिथे कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, तिथेच लॉकडाऊन केलं जाऊ शकतं.

मुंबईत कुठे कुठे लॉकडाऊनची शक्यता?

मध्य मुंबईच्या कुर्ल्यातलं नेहरु नगर, तिलक नगर, विक्रोळी, घाटकोपरला डेंजर झोन म्हणून गणलं जाऊ लागलंय. या विभागांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येऊ शकतं. मुंबई पश्चिममध्ये ब्रांदा, खार, अंधेरी, जोगेश्वरी (पूर्व) या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या क्षेत्रांना देखील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येऊ शकतं.

हे ही वाचा :

कोरोना संसर्ग वाढला, पुण्यात खासगी रुग्णालयात 50 टक्के बेड्स आरक्षित, अकोला जिल्ह्यात संचारबंदी

(Health Minister Rajesh Tope on lockdown in Maharashtra)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.