Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?

महाराष्ट्राला कोरोनाच्या भीषण तडाख्यातून वाचवण्यासाठी आता ठाकरे सरकार अमरावती पॅटर्नच्या लॉकडाऊनची तयारी करत असल्याचे समजते. | Lockdown in Maharashtra

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 10:45 AM

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे गुढीपाडव्यानंतर महाराष्ट्रात अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) करण्यात आला होता. या लॉकडाऊनंतर अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि मृतांचा आकडा कमी झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्राला कोरोनाच्या भीषण तडाख्यातून वाचवण्यासाठी आता ठाकरे सरकार अमरावती पॅटर्नच्या लॉकडाऊनची तयारी करत असल्याचे समजते. (CM Uddhav Thackeray may impose lockdown in Maharashtra after Gudi Padwa)

लॉकडाऊनचा अमरावती पॅटर्न नेमका काय आहे?

अमरावती पॅटर्नप्रमाणे लॉकडाऊन झाल्यास राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल, अशी आशा राज्य सरकारला आहे. त्यामुळे यामध्ये थोडेफार बदल करुन हाच पॅटर्न सरसकट वापरला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. यंदा देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी होणारा अमरावती हा बहुधा देशातील पहिला जिल्हा आहे. कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळात अमरावतीमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या लॉकडाऊनचा कालावधी आणखी 8 दिवसांनी वाढवण्यात आला. या हिशेबाने अमरावतीत 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लावण्यात आला.

या काळात अमरावती शहर आणि अचलपूर तालुका पूर्णपणे बंद होता. येथील कंटेन्मेंट झोनमधील लोकांना तर घराबाहेर पडण्यासही बंदी घालण्यात आली होती.मात्र, या 15 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अमरावतीमधील कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाली. 1 फेब्रुवारीला अमरावतीमध्ये कोरोनाचे 92 रुग्ण होते. 5 फेब्रुवारीपर्यंत हा आकडा 233 वर पोहोचला. 10 फेब्रुवारीला रुग्णसंख्या 369 तर 20 फेब्रुवारीला अमरावतीमध्ये 1058 रुग्ण सापडले.

मात्र, 15 दिवसांच्या लॉकडाऊनंतर परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारली. लॉकडाऊनआधी आणि नंतर अमरावती चाचण्याचे प्रमाण सारखेच होते. लॉकडाऊपूर्वी दिवसाला 2500 ते 2600 चाचण्या केल्या जात असत. तेव्हा दिवसाला 900 रुग्ण पॉझिटिव्ह सापडत होते. मात्र, लॉकडाऊननंतर हे प्रमाण 300 ते 350 पर्यंत खाली आले. तर कोरोना पॉझिटिव्हिटी रेटदेखील 48 टक्क्यांवरून 9 टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यामुळे महाराष्ट्रातही असाच लॉकडाऊन झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो, अशी आशा राज्य सरकारला आहे. संबंधित बातम्या:

मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग, कोव्हिड सेंटर्ससाठी BMC पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार

मुंबईकरांसाठी गरज असेल तिथे व्यवस्था, वरळी, कांजूरसह अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरसह, ICU बेडची सोय

6 Minutes Walk Test : टास्क फोर्सने कोरोना रुग्णासाठी सुचवलेली 6 मिनिटे वॉक टेस्ट नेमकी काय?

(CM Uddhav Thackeray may impose lockdown in Maharashtra after Gudi Padwa)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.