बसमध्ये उभ्या प्रवाशांना बंदी, रिक्षा-टॅक्सीसह इतर सार्वजनिक वाहतुकीसाठी नियम काय?

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे.  (Lockdown Public Transport Travel Rules)

बसमध्ये उभ्या प्रवाशांना बंदी, रिक्षा-टॅक्सीसह इतर सार्वजनिक वाहतुकीसाठी नियम काय?
बसमध्ये उभ्या प्रवाशांना बंदी, रिक्षा-टॅक्सीसह इतर सार्वजनिक वाहतुकीसाठी नियम काय?
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 12:24 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात सार्वजनिक वाहतुकीबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात लोकल ट्रेन, टॅक्सी, बस, रिक्षा चालकांना तसेच यातून प्रवास करणाऱ्यांसाठी नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. (Maharashtra Lockdown Public Transport Travel Rules and Guidelines)

मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा सुरुच ठेवण्यात येणार आहे. मात्र, सर्वांना लोकल सेवेचा उपयोग करता येणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

सार्वजनिक वाहतुकीसाठी निर्बंध काय?

?अटोरिक्षा = चालक अधिक २ प्रवासी

?टँक्सी (चारचाकी) = चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमता

?बस = पूर्ण प्रवासीक्षमता, उभे प्रवासी बंदी

? लोकल – अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी

सार्वजनिक वाहतुकीदरम्यान प्रवाशांसाठी नियमावली

➡️सर्व प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे. मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड केला जाईल

➡️चारचाकी टॅक्सीमध्ये एखाद्या प्रवाशाने मास्क न घातल्यास तो प्रवासी आणि चालकालाही पाचशे रुपये दंड केला जाईल. प्रत्येक खेपेनंतर वाहनं सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे

➡️भारत सरकारच्या नियमानुसार सर्व प्रवासी वाहनांचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कोविड सुसंगत वागणुकीचे दर्शन घडवणेही गरजेचे आहे. टँक्सी आणि अटोरिक्षांसाठी चालकाने स्वतःच्या आणि प्रवास्यांच्यामधे प्लास्टिकचे आवरण घालून संरक्षक कवच निर्माण करायला हवे.

➡️सार्वजनिक वाहतुकीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास हे वैध कारण असेल.

➡️बाहेरगावच्या ट्रेन्ससाठी रेल्वेप्रशासनाने उभे राहून कोणीही प्रवासी प्रवास करणार नाहीत, याची खातरजमा करावी. तसेच सर्व प्रवासी मास्क लावतील, हेही बघावे.

➡️कोविडसुसंगत वागणूक न केल्यास पाचशे रुपयांचा दंड सर्व ट्रेन्समधेही लावावा. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देतानाच ती सुरळीतपणे व्हावी, यासाठी लागणाऱ्या नैमित्तिक सेवाही त्यात समाविष्ट करूनच ही परवानगी देण्यात आलीय. त्यात हवाईसेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या कार्गोसारख्या सेवा तसेच तिकीटविषयक सेवांचाही समावेश आहे.

➡️सार्वजनिक वाहतुकीने म्हणजे बस, ट्रेन किंवा विमानाने आलेल्या प्रवाशाला येताना किंवा जाताना घरी जाण्यासाठी वा घरून येण्यासाठी करावा लागणारा प्रवास वैध प्रवासतिकीट दाखवून करता येईल. (Maharashtra Lockdown Public Transport Travel Rules and Guidelines)

संबंधित बातम्या :  

CM Uddhav Thackeray : 14 एप्रिलपासून राज्यभर संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Lockdown | पार्सल किंवा होम डिलिव्हरीला प्राधान्य, हॉटेल रेस्टॉरंटसाठी नवे नियम काय?

Maharashtra Lockdown | राज्यात संचारबंदी, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी नियम काय?

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.