Maharashtra Lockdown: तुमची नोकरी-व्यवसाय जीवनावश्यक सेवांच्या यादीत येते का, पाहा ही संपूर्ण यादी

तुमची नोकरी किंवा व्यवसाय या यादीत असेल तर तुम्हाला लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडता येईल | Maharashtra Lockdown

Maharashtra Lockdown: तुमची नोकरी-व्यवसाय जीवनावश्यक सेवांच्या यादीत येते का, पाहा ही संपूर्ण यादी
१ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 12:52 PM

मुंबई: कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 14 एप्रिल रोजी रात्री आठ वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी (Lockdown) लागू करण्यात आली आहे. या काळात राज्यभरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत. जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता इतर महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून निर्बंध जारी करण्यात आले आहेत. (Essential service have permission to work in period of Lockdown in Maharashtra)

मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या काळात काय सुरू राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे.

जीवनावश्यक श्रेणीत समावेश असलेल्या बाबी खालीलप्रमाणे:

१.  रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात उत्पादन आणि वितरणसंबंधी आस्थापना असतील म्हणजे वितरक, वाहतूकदार, पुरवठा साखळीतले लोक. लशींचे उत्पादन आणि वितरण, सँनेटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे, इतर पूरक उत्पादने आणि सेवा.

२.  पाळीव प्राण्यांसाठीची खाद्य दुकाने, प्राण्यांसंबंधी सेवा, प्राण्यांचे निवारागृह आदी.

३.   किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरीज, बेकऱ्या, सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने ४.  शीतगृहे आणि वखार सेवाविषयक आस्थापना ५.  सार्वजनिक वाहतूक – हवाई सेवा, रेल्वेसेवा, टँक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या. ६.  विविध राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आणि अनुषंगिक सेवा ७.  स्थानिक प्रशासनांच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती कामे ८.  स्थानिक प्रशासनाची सर्व सार्वजनिक कामे ९.  ऱिझर्व्ह बँक आणि तिनं आवश्क ठरवलेली सर्व कामे १०.  सेबीनं मान्यताप्राप्त ठरवलेली सर्व कामं ज्यात स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिरी, क्लिअरिंग संबंधीची कामं अशी कामे ११. दूरसंचार सेवांशी संबंधित सेवा, देखभाल दुरुस्ती १२. मालवाहतूक १३. पाणीपुरवठा विषयक सर्व कामे, सेवा १४. शेतीशी संबंधित सर्व कामे आणि शेती निरंतरपणे होऊ शकेल यासाठीची सर्व कामे. य़ात बीबियाणे, खते, उपकरणे आणि दुरुस्ती हे सर्व समाविष्ट आहे. १५. आयात निर्यात विषयक सर्व व्यवहार १६. जीवनावश्यक वस्तूविषयक ई-कॉमर्स १७. अधिस्वीकृतीप्राप्त माध्यमकर्मी १८. पेट्रोल पंप आणि पेट्रोलसंबंधी उत्पादने, सुदूर समुद्रात वा किनारपट्टीवरील उत्पादने १९. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा २०.  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या क्लाऊडसेवा, डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधांसाठीच्या महत्त्वाच्या माहिती-तंत्रज्ञानविषयक सेवा २१. सरकारी आणि खासगी सुरक्षारक्षक सेवा २२. विद्युत तसेच गँसपुरवठा सेवा २३.  एटीएम आणि तत्संबंधीच्या सेवा २४.  टपालसेवा २५. बंदरे आणि ततस्बंधीच्या सेवा २६. लस तसेच इतर जीवरक्षक औषधे आणि औषधी उत्पादकांचे कस्टम हाऊस एजंट तसेच परवानाधारक मल्टिमोडल वाहतूकदार २७. कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे कच्चे माल किंवा वेष्टनसामुग्री बनवणारे कारखाने २८.  आगामी पावसाळ्यासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमधे कार्यरत कारखाने २९.  स्थानिक आपत्तीनिवारण प्राधिकरणाने जीवनावश्यक ठरवलेली कोणतीही सेवा

(Essential service have permission to work in period of Lockdown in Maharashtra)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.