मोठी बातमी: अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला, सूत्रांची माहिती

आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हेदेखील बघावे लागेल. | Sanjay Rathod resign

मोठी बातमी: अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला, सूत्रांची माहिती
Sanjay Rathod-Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 11:17 AM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मंगळवारी सकाळी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा स्वीकारणार का? आता मुख्यमंत्री हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवतील का?, पाहावे लागणार आहे.  (Big breaking CM Uddhav Thackeray sack MLA Sanjay Rathod in Pooja Chavan suicide case)

दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हेदेखील बघावे लागेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कडक कारवाई

संयमी पण कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन, कडक कारवाई केली. उद्धव ठाकरे यांनी कारवाई केलेले हे पहिलेच मंत्री ठरले आहेत. महत्त्वाचं म्हणजे संजय राठोड हे महाविकास आघाडीचे मंत्री असले तरी ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मंत्र्यावर कारवाई करुन कडक इशारा दिला आहे.

नेमका कोणत्या प्रकरणात राजीनामा?

संजय राठोड यांनी नेमका कोणत्या प्रकरणात राजीनामा दिला हे एव्हाना राज्याला माहिती झालं आहे. मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

ऑडिओ क्लिपमधून उलगडा ?

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलिसांनी दिली ना, पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचं समजतं. हे संपूर्ण प्रकरण तापत गेलं आणि ते संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर येऊन पोहोचलं.

पूजाला न्याय मिळणार?

दरम्यान, या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा तर घेतला आहे. मात्र आता संजय राठोड यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे. कारण ना राजीनाम्याने, ना संजय राठोड यांना शिक्षा केल्याने, पूजा परत येऊ शकेल. मात्र कायदा हा सर्वांसाठी समान आहे हे जर पुन्हा एकदा सिद्ध करायचं असेल तर संबंधित मंत्र्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी विरोधक करत आहेत, त्यात गैर काहीच नसावं.

कोण आहेत संजय राठोड?

संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत

शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.

त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले.

फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.

2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला.

संजय राठोडांच्या मुसक्या आवळा, चित्रा वाघ यांची पहिली आक्रमक मागणी

संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा अशी पहिली आक्रमक मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. चित्रा वाघ यांनी पहिल्यादां संजय राठोड यांचं थेट नाव घेतलं होतं. चित्रा वाघ म्हणाल्या, “पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून, हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसात आपल्यासमोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास दहा ११ ऑडिओ क्लिप, फोटोज समोर आलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, असं मंत्री अरुण राठोड नावाच्या माणसाला सांगत आहेत. हे आपण ऐकलं. पोलीस याबाबत काहीच स्पष्टता देत नाहीत. पूजा राठोड हिच्या परिवारावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सदसदविवेकबुद्धी शाबूत ठेवून, सुमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा. या फोटोज, ऑडिओ क्लिप्सना गेले दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे.

भाषणांमध्ये महिलांची सुरक्षांबद्दल बोलणं, घोषणा करणं सोपं असतं. पण आता मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचं आहे, कसली वाट बघताय? एवढे पुरावे आहेत, फोटो आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, मुसक्या आवळायचे सोडून, कसली वाट बघताय? ताबडतोब कारवाई करा”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडनेच स्थानिकांपर्यंत ऑडिओ क्लिप पोहोचवल्या

मोठी बातमी: संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता; शिवसेनेत दोन गट

‘संजय राठोडांना बंजारा समाजाचा पाठिंबा नाही, आपल्या गटाच्या काही लोकांकडून ते हवं ते वदवून घेतायत’

(Big breaking CM Uddhav Thackeray sack MLA Sanjay Rathod in Pooja Chavan suicide case)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.