AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electricity Bill: राज्यावर विजेचं संकट अन् मंत्री, आमदारांनीच थकवली लाखोंची बिलं; आकडे पाहून डोळे विस्फारतील

Electricity Bill: ऊर्जा विभागाने वीज थकबाकीदारंची यादी जाहीर केली आहे. 30 एप्रिल 2022 पर्यंतची ही यादी आहे.

Electricity Bill: राज्यावर विजेचं संकट अन् मंत्री, आमदारांनीच थकवली लाखोंची बिलं; आकडे पाहून डोळे विस्फारतील
राज्यावर विजेचं संकट अन् मंत्री, आमदारांनीच थकवली लाखोंची बिलं; आकडे पाहून डोळे विस्फारतीलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 4:40 PM

मुंबई: कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्यात विजेचं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचा लंपडाव सुरू आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यात हीच परिस्थिती आहे. तर ऊर्जा विभागाही आर्थिक संकटाचा सामना करत असतानाच एक धक्कादायक माहिती आली आहे. राज्यातील मंत्री, खासदार, आमदारांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनीही विजेचं लाखोचं बिल (Electricity Bill) थकवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्यापासून ते संभाजी छत्रपतींपर्यंतच्या खासदारांनी वीज बिल थकवलं आहे. तर वीज बिल थकवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नियम सर्वांसाठी समान आहेत, असा इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे वीज बिल (Electricity) थकविणाऱ्या या मंत्र्यांवर कधीपासून कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ऊर्जा विभागाने वीज थकबाकीदारंची यादी जाहीर केली आहे. 30 एप्रिल 2022 पर्यंतची ही यादी आहे. राज्यातील आमदार, खासदारांसह मंत्री आदी 372 ग्राहकांची 1 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी असल्याचं उघड झालं आहे. राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचे वीज बिल थकलं तर लगेच त्यांची वीज कापली जाते. मात्र, आता आमदार, मंत्रीच वीज थकवत असल्याने त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

कोणाचे किती बील थकीत यादी

>> राजेश टोपे – 4 लाख रूपये >> नाना पटोले – 2 लाख 63 हजार >> संभाजी छत्रपती – 1 लाख 25 हजार >> आमदार संग्राम थोपटे – 1 लाख रूपये >> मंत्री संदिपान भुमरे – 1 लाख 50 हजार >> आमदार जयकुमार गोरे – 7 लाख रूपये >> रणजितसिंह निंबाळकर खासदार – 3 लाख रूपये >> रावसाहेब दानवे मंत्री – 70 हजार रूपये >> अनिल देशमुख यांची 2 लाख 25 हजार थकीत >> समाधान आवताडे- 20 हजार >> आमदार राजेंद्र राऊत बार्शी – 3 लाख 53 हजार >> आमदार प्रकाश सोळंके – 80 हजार >> आमदार संदीप क्षीरसागर – 2 लाख 30 हजार >> राज्यमंत्री संजय बनसोडे – 50 हजार >> आमदार अशिष जयस्वाल – 3 लाख 36 हजार >> आमदार महेश शिंदे – 70 हजार >> माजी मंत्री सुरेश खाडे -1 लाख 32 हजा >> सुमन सदाशिव खोत – 1 लाख 32 हजार 435 >> माजी मंत्री सुभाष देशमुख – 60 हजार >> माजी खासदार प्रतापराव जाधव- 1 लाख 50 हजार >> खासदार रणजितसिंह निंबाळकर- 3 लाख >> शिवसेना आमदार सुहास कांदे – 50 हजार >> आमदार रवी राणा- 40 हजार रुपये >> आमदार वैभव नाईक- 2 लाख 80 हजार >> माजी मंत्री विजयकुमार गावित- 42 हजार >> माजी आमदार शिरीष चौधरी- 70 हजार >> खासदार रजनीताई पाटील- 3 लाख रुपये >> आमदार बबनराव शिंदे व त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांची तब्बल 22 विज जोडणीतील तब्बल 7 लाख 86 हजार रुपयांची थकीत

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.