BMC स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी Income Tax चा छापा, तपास यंत्रणांचा मोर्चा शिवसेनेकडे?

यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना नेते असल्याचं चित्र आहे

BMC स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी Income Tax चा छापा, तपास यंत्रणांचा मोर्चा शिवसेनेकडे?
यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाडImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 9:39 AM

मुंबई : शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल झालं आहे. सीआरपीएफ जवानांसह (CRPF Jawan) आयकर विभागाचं पथक शुक्रवारी सकाळीच त्यांच्या घरी पोहोचलं. सुरुवातीला ईडीने ही कारवाई केल्याचा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र अंमलबजावणी संचलनलायाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर ही इन्कम टॅक्स विभागाची धाड असल्याचं समजलं. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यानंतर आता तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना नेते असल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रकरण

शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच दाखल झाले. मुंबईतील माझगाव भागात असलेल्या त्यांच्या घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु असल्याचे समजते. सध्या त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहेत.

आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

यशवंत जाधव यांच्याकडे पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा आहे. जाधवांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा आणखी एका नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचं दिसत आहे.

ईडीने धाड टाकल्याचा संभ्रम

यशवंत जाधवांच्या घरी ईडीने धाड टाकल्याची चर्चा सुरुवातीला होती. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपण ही छापेमारी केली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही आयकर विभागाची धाड असल्याचे बोलले जात आहे. आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाधवांवर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनी ईडी- आयकर विभागाला तक्रार केल्यानंतर यशवंत जाधव यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तिला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

एक नवाब, सौ जबाब; मालिकांच्या अटकेविरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

सकाळी-सकाळी ED अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले, तेव्हा नेमकं काय घडलं ? ऐका…

मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर सत्ताधारी ‘मविआ’चे आंदोलन सुरू; आदित्य-राऊत यूपीमध्ये…!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.