“शिवछत्रपतीची शपथ घेऊन सांगतोय…”; राज ठाकरे यांनी ठळक गोष्ट तिच सांगितली…
शिवसेनेतून जे नेते बाहेर गेले, त्यापैकी एक म्हणजे नारायण राणे. नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडलेच नसते. मात्र त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना कुणीतरी काही तरी सांगत असल्याचेही त्यावेळी समजले आणि त्यानंतर जी शिवसेनेची वाताहात झाली ती याच कारणामुळे झाली असल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मुंबई : राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले असताना, एकीकडे पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी वरळीत सभा घेतली, तिथं लगेच एकनाथ शिंदे यांनी जाऊन सभा घेतली, खेडमध्ये सभा घेतली तिथंही मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. मग राज्याच्या प्रश्नांचं काय असा खडा सवाल विचारत उद्धव ठाकरे यांच्यापासून एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी शिवतिर्थवरून जोरदार हल्लाबोल केला. शिवतिर्थवरून बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या राजकारणापासून ते अगदी एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधीवरही त्यांनी जोरदार टीका केली.
राज ठाकरे यांनी बोलताना त्यांनी ठाकरे कुटुंबातील राजकीय मतभेद सांगायच्या नाहीत म्हणत त्यांनी महाबळेश्वरचा एक प्रसंग सांगितला.
शिवसेनेवर आज जी परिस्थिती ओढावली आहे.त्याला जबाबदार दुसरं कुणीच नाही तर तुम्ही स्वतः जबाबदार असल्याचे उद्धव ठाकरे यांना त्यांनी टोला लगावला आहे.
त्यानंतर त्यांनी हॉटेल ऑबेरॉयमधील उद्धव ठाकरे आणि आपला प्रसंग सांगितला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही समोरा समोर बसून सांगितले.
आणि हे मी आता शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो आहे की, ते उद्धव ठाकरे यांना ते म्हणाले की, तुला पक्षाचं अध्यक्ष व्हायचंय? तर हो, मुख्यमंत्री व्हायचं? तर हो.
तुला जे व्हायचं ते हो. मला फक्त सांग माझं काम काय? असंही त्यांनी स्पष्टपणे विचारले असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना म्हणाले की, मला फक्त प्रचाराला तुम्ही ठेऊ नका.
तर इतरवेळी तुम्ही मला आतमध्ये ठेवायचं आणि प्रचाराला बाहेर काढायचं हा मला प्रोब्लेमच नाही असंही त्यांनी ती आठवण सांगितली.
या भेटीनंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आमच्यातील प्रॉब्लेम मिठला असल्याचेही मी त्यांना सांगितले अशी आठवणही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
शिवसेनेतून जे नेते बाहेर गेले, त्यापैकी एक म्हणजे नारायण राणे. नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडलेच नसते. मात्र त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना कुणीतरी काही तरी सांगत असल्याचेही त्यावेळी समजले आणि त्यानंतर जी शिवसेनेची वाताहात झाली ती याच कारणामुळे झाली असल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला.