मुंबईतील मराठी माणसाचा दिलदारपणा जगात भारीय..असं परप्रांतीय म्हणतात; आणि हे सर्वेक्षणातूनही झालंय सिद्ध
महाराष्ट्र राज्याला आणि राजधानी मुंबईला 62 वर्षे साजरी होत असताना महाराष्ट्रात जन्मलेले आणि इतर राज्यात जन्मलेल्या अशा 1,300 लोकांच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, राज्यातील सर्वात सगळ्यात प्रशंसनीय आणि आदर्शवादी नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानले जाते. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर ज्यांचा क्रमांक लागतो तो शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा.
मुंबई: सध्या महाराष्ट्र आणि मुंबई शहर (Mumabai City) अनेक बऱ्या वाईट कारणांमुळे चर्चेत आले आहे. कधी घोटाळे, कधी हाय प्रोफाईल व्यक्तींच्या अटकेमुळे तर कधी कोट्यवधींच्या घोटाळ्यांमुळे महाराष्ट्राची (Maharashtra) चर्चा होऊ लागली आहे. त्यातच अलीकडे धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) धार्मिक विषयांवरुन वातावरुन तापले असून राज्यात ही एक नवी समस्या निर्माण झाली आहे. या सर्व वातावरणातही मुंंबईच्या मराठी माणसाचा एक गुण नोंदवला गेला आहे तो म्हणजे मुंबईकर इतरांबरोबर वागतानाही तो चांगलाच वागतो मग तो मराठी माणूस असो की, परप्राताीय असो. त्यांना तो चांगलीच वागणूक देतो.
मराठी माणूस चांगलाच…
राज्यात सध्या राजकीय आणि सामाजिक वातावर तापलेले असतानाच C-voter कडून झालेल्या सर्वेक्षणात मात्र राज्यातीलच एक चांगली बाजू समोर आली आहे. राज्यातील राजकीय नेते सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण व्हावी अशी वक्तव्य करणे, राजकारणातील प्रचंड गलथाणपणा आणि राज्यात कुठे कुठे हिंसाचार घडत असूनही राज्यातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त अमराठी म्हणजेच परप्रांतीय लोकं सांगत आहेत की, त्यांना स्थानीक मराठी माणूस चांगलेपणाने वागवत आहे. तो वागणूकही चांगलीच देतो. आणि तोच प्रकार स्थानिक लोकांनी जे स्थलातंरित किंवा अमराठी आहेत त्यांच्याविषयी ते म्हणतात की, बाहेरुन आलेले लोकांचा आम्हाला धोका वाटत नाही, असं सांगणारी मराठी माणसंही 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत.
सगळ्यांचे आदर्श बाबासाहेब आंबेडकर
महाराष्ट्र राज्याला आणि राजधानी मुंबईला 62 वर्षे साजरी होत असताना महाराष्ट्रात जन्मलेले आणि इतर राज्यात जन्मलेल्या अशा 1,300 लोकांच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, राज्यातील सर्वात सगळ्यात प्रशंसनीय आणि आदर्शवादी नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानले जाते. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर ज्यांचा क्रमांक लागतो तो शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा. ज्या C-voter कडून सर्वेक्षण करण्यात आले आहे त्यामध्ये जे अमराठी लोक आहेत त्यापैकी 35.2 टक्के लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडले आहे तर 32.3 टक्के मराठी लोकांनीही त्यांनाच आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले. यावेळी असेही सांगण्यात आले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आधुनिक महाराष्ट्रात झाला नसून आधुनिक मध्य प्रदेशात झाला आहे.
अण्णा हजारे, लता मंगेशकरांचा चाहता वर्ग घटला
तर या सर्वेक्षणात “दुसरा सर्वात प्रशंसनीय नेता सांगण्यात आला आहेत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांना अनुक्रमे १५.३ टक्के आणि १७.१ टक्के अ-मराठी आणि मराठी लोकांकडून निवडण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे मुंबईकरांना प्रेरणा देतात असे वाटत नाही असंही सांगण्यात आले आहे. या सगळ्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब ही आहे की, नुकत्याच दिवंगत झालेल्या लता मंगेशकर यांना 3.5 टक्केही मते मिळाली नाहीत. तर जवळपास 11 टक्के अ-मराठी लोकांनी जे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना निवडले आहे तर फक्त 4 टक्के मराठी माणसांनीच फक्त त्यांचा उल्लेख सर्वेक्षणात केला आहे.
पावभाजी सगळ्या भारी
आवडता पदार्थ म्हणून मराठी आणि अमराठी लोकांनी पावभाजी या पदार्थालाच पसंती दिली आहे. तर दोन्ही माणसांनी मुंबईतील सर्वोत्तम गोष्ट काय यापैकी त्यांनी सुरक्षा म्हणून सांगितले आहे.
वाहतूक व्यवस्था वाईटच
या सर्वेक्षणात वाईट गोष्ट कोणती असाही मुद्दा होता, तो मात्र मतभेद निर्माण करण्यासारखा झाला. यावर मत नोंदविताना सांगण्यात आले आहे की, मराठी लोकांची गर्दी आणि मुंबई हे जास्त लोकसंख्या असलेलं शहर आहे असं सांगितले गेले आहे. वाहतूक व्यवस्थेबद्दल तर वाईट मत नोंदवत त्यांनी सांगितले आहे की, सार्वजनिक वाहतून ही गंभीर समस्या असल्याचे मत मराठी आणि अमराठी या दोघानीही त्याची नोंद केली आहे.
अमिताभ अजूनही सुपरहिट
बॉलीवूडविषयी ज्या वेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी सर्वाधिक पसंती ही अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी अनुक्रमे 25 टक्के आणि 24 टक्के मतांची नोंद केली आहे. याविषयी मत नोंदविताना त्यामध्ये फारसा कोणताही फरक जाणवलेला नाही. आमिर, शाहरुख आणि सलमान खान या दिग्गज खान त्रिकुटांपैकी कोणीही 10 टक्क्यांपर्यंत पोहोचला नाही, असे सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.