AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics Crisis | राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थिती, राष्ट्रवादीकडून ‘या’ 3 बंडखोरांची हकालपट्टी

NCP Crisis | पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील एक्शन मोडमध्ये आले आहेत. जयंत पाटील यांनी 3 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Maharashtra Politics Crisis | राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थिती, राष्ट्रवादीकडून 'या' 3 बंडखोरांची हकालपट्टी
| Updated on: Jul 03, 2023 | 5:19 PM
Share

मुंबई | राज्य सरकारचा रविवारी 2 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असं समजलं जात होतं. मात्र पडद्यामागे काही वेगळचं घडत होतं. शिवेसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील आमदारांनी बंड पुकारलं आणि राज्य सरकारमध्ये सामील झाले. राष्ट्रवादीचे हे आमदार सरकारच्या गळाला लागले. अजित पवार यांच्यासह एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांनी गेल्या साडे तीन वर्षात एकूण तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उर्वरित 8 आमदारांना राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांही हजेरी लावली होती. या बंडखोर नेत्यांविरोधात राष्ट्रवादी एक्टीव्ह मोडमध्ये आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या 3 नेत्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे या 3 नेत्यांवर कारवाई करत असल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादीने माजी मंत्री शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे आणि विजय देशमुख या तिघांविरोधात बडतर्फीची कारवाई केली आहे. या तिन्ही नेत्यांनी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या तिन्ही नेत्यांची ही कृती राष्ट्रवादीच्या शिस्त आणि पक्षाच्या ध्येयधोरणे विरोधात असल्याचं म्हटलंय. या कारणामुळे या तिन्ही नेत्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

राष्ट्रवादी काँग्रेस एक्शनमोडमध्ये

शिवाजीराव गर्जे यांची राष्ट्रवादीच्या सदस्यत्यावरुन आणि राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. तर विजय देशमुख यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि अकोला शहर जिल्हाध्यक्ष पदावरुन बडतर्फ करण्यात आलं. तर नरेंद्र राणे यांच्याकडे मुंबई विभागीय राष्ट्रवादी कार्याध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे.

शिवाजीराव गर्जे कोण आहेत?

शिवाजीराव गर्जे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. गर्जेंचे राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेत्यांसह घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गर्जे यांच्याकडे 2014 साली राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या वंसतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाची जबाबदारी होती.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.