Sharad Pawar : शरद पवारांचे विश्वासू प्रफुल्ल पटेलांनी ‘या’ गोष्टीमुळे दिला पवारांना दगा?, समोर आली मोठी माहिती!
काही दिवसांआधी राष्ट्रवादीत अनेक पक्षाअंतर्गत बदल करण्यात आले होते. शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांकडून नामंजूर करण्यात आला. . मात्र आता प्रफुल्ल पटेल यांनीच शरद पवारांचा विश्वासघात केला आहे. अजित पवार यांच्या बंडामागे प्रफुल्ल पटेल असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात जे वर्षभरापूर्वी घडलं तेच आता घडताना दिसत आहे. फक्त पक्ष आणि पात्र बदललंय. एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली तर आता अजित पवार हे राष्ट्रवादी फोडण्याच्या तयारीत आहे. बंड होताच शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. तातडीने शरद पवार यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. पक्षाच्या घटनेत आणि न्यायालयाच्या कचाट्यात न पडता हा बंड कसा मोडून काढता येईल, याची तयारी दोन्ही गटाकडून करण्यात आली आहे. काही दिवसांआधी राष्ट्रवादीत अनेक पक्षाअंतर्गत बदल करण्यात आले होते. शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांकडून नामंजूर करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीला भरवण्यात आलेल्या सभेत शरद पवार यांनी दोन कार्याध्यक्ष पद निर्माण केले. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल आणि पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्ष पदावर नेमणूक केली. मात्र आता प्रफुल्ल पटेल यांनीच शरद पवारांचा विश्वासघात केला आहे. अजित पवार यांच्या बंडामागे प्रफुल्ल पटेल असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहेत.
शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करुन त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. या कारवाईनंतर थोड्याच वेळात अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांना आम्हाला पक्षातून बडतर्फ करण्याचा अधिकार नाही. आमची नेमणूक पक्षाच्या कार्यकारणीने केलेली असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलंय. मात्र राज्यात सर्वत्र चर्चा आहे ती प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची साथ कशी आणि कोणत्या कारणामुळे सोडली? याच पार्श्वभूमीवर पटेल यांना थेट केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याचं बोललं जात आहेत.
प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रीपद?
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना भाजपकडून केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती समजत आहे. 2024 लोकसभा निवडणूकीनंतरच्या केंद्रीय मंत्रीमंडळात प्रफुल्ल पटेल यांना स्थान देण्यात येणार असल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे. अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फ केलं आहे.